मुबंई पुणे एक्सप्रेसवेवर टेम्पोने दिली टँकरला जोरदार धडक ....चालक केबिन मध्ये अडकल्याने गंभीर जखमी

 मुबंई पुणे एक्सप्रेसवेवर टेम्पोने दिली टँकरला जोरदार धडक ....चालक केबिन मध्ये अडकल्याने गंभीर जखमी 



पाताळगंगा न्यूज : दत्तात्रय शेडगे 
खालापूर : ३ नोव्हेंबर,


              मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर अपघाताची मालिका सतत चालू असून आज  रात्री किमी 37.800 वर आयसर टेम्पोने समोरील टँकरला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात टेम्पोच्या केबिन  मध्ये चालक अडकला होता, 
           मुबंई पुणे एक्सप्रेस वेवरून आयसर टेम्पो क्रमांक (MH14KA 1112)हा माल घेऊन पुण्यावरून मुबंई कडे जात असताना बोरघाटात आला असता चालकाचे टेम्पो वरील नियंत्रण सुटल्याने टेम्पोने समोरील टँकर क्रमांक (GJ23Y6975)ला  जोरदार धडक दिली 
             यात टेम्पोच्या केबिन मध्ये चालक अडकला होता त्याला तात्काळ देवदूत टीमने तात्काळ बाहेर काढून  असून पुढील उपचारासाठी एमजीएम  रुग्णालयात दाखल केले, तर यात टँकर आणि टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दोन्ही वाहने क्रेनच्या साहाय्याने रस्त्याच्या बाजूला घेऊन  एक्सप्रेसवे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला,

Post a Comment

0 Comments

खोपोली पोलीस स्टेशनमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन