मनोबल वाढावे,यासाठी आरपीआय (आठवले गट) तालुका अध्यक्ष महेंद्रजी धनगावकर,यांनी घेतली उमेद्वरांची भेट

मनोबल वाढावे,यासाठी आरपीआय (आठवले गट) तालुका अध्यक्ष महेंद्रजी धनगावकर,यांनी घेतली उमेद्वरांची भेट,




पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
माजगांव / आंबिवली ३ नोव्हेंबर,
   
                  भैरवनाथ ग्रामविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून ग्रूप ग्राम पंचायत माजगांव च्या निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले उमेद्वार हे प्रभाग क्रमांक १ मधून सूर्यकांत कांबळे ( एस .के.) आर.पी.आय खालापूर तालुका उपाध्यक्ष म्हणून त्यांच्या हे पद आहे.तसेच प्रभाग क्रमांक ३ मधून संचिता सूर्यकांत कांबळे हे अधिकृत उमेद्वार असून शिवाय यांची जनसंपर्क दांडगा असल्यामुळे त्याच बरोबर निवडणुकीच्या वेळी त्यांचे मनोबल वाढावे यासाठी आरपीआय (आठवले गट) तालुका अध्यक्ष महेंद्रजी धनगावकर, तसेच किशोरजी निकाळजे, नागेजी बाविस्कर यांनी कांबळे परिवारांची भेट घेवून त्यांचे मनोबल वाढविले आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,जनतेमध्ये तुमचे काम हे उत्तम प्रकारे असल्यामुळे या निवडणुकांमध्ये आपण विजयी होणार असे आशीर्वाद आणी मार्गदर्शन केले.


                सूर्यकांत कांबळे ( एस .के.) यांचा राजकीय अनुभव दांडगा असून ते जनसामान्यात सुख - दुखात सातत्याने सहभागी असतात. शिवाय एक डॅसिंग आणी आक्रमक भुमिका असलेले व्यक्तीमत्व म्हणून त्यांचे नाव सर्वांच्याच परिचयांचे आहे.आज वर त्यांनी ग्रामसभा,गाजविल्या आहेत त्याच बरोबर आंदोलन विषय या मध्ये त्यांचा सिहांचा वाटा आहे.राजकारण मुरलेली व्यक्तीमत्व म्हणून त्यांचे नाव घेतले जाते.विविध सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग अतुलनीय असल्यामुळे सध्या त्यंच्याच नावांची चर्चा ऐकण्यांस मिळत आहे.
               निवडणुका म्हटली एखाद्या उमेद्वारांचे राजकीय प्रवास सुरु होत असतो.मात्र जी व्यक्ती सातत्याने अनेकांच्या संपर्कात असल्यामुळे त्यांना मतदारांचे मन परिवर्तन करण्यांस वेळ लागत नाही सूर्यकांत  कांबळे म्हणजे हसरी व्यक्तीमत्व निवडणुकीत काही होवो !आपण मात्र विजयांच्या समिप असून मतदार राजावर आमचा विश्वास असून तो आमच्यासाठी लाख मोलांचा आहे.असे भावनिक आवाहन करण्यात आले.
          

Post a Comment

0 Comments

 रस्ता, पाणी, वीजसह मूलभूत सुविधांसाठी,ऊंबरणेवाडी-खोंडावाडी ग्रामस्थांचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना निवेदन