आपच्या ६ नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या बेमुदत साखळी उपोषणास समाजातील विविध स्तरातून पाठिंबा...
जनतेच्या हितासाठी आपचे अधिकारी वर्गास कामासाठी आग्रह वजा विनंती...
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
खोपोली : १ नोव्हेंबर,
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अश्या विठ्ठल मंदिर देवस्थान समोरील ताकई मंदिर रोड ते ताकई येथे जाणारा रोड हा प्रशासकीय कात्रीत अडकला आहे.स्थानिक जनता,विद्यार्थी, पालक,कामगार,आस्थणा चालक,आजारी जनता यांच्यासाठी अनेक महिन्यांपासून प्रलंबित असणारा हा रोड डोकेदुखी ठरत आहे.
शहरातील अनेक समस्या यावर आवाज उठविणाऱ्या आम आदमी पार्टीने जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नावर आंदोलन उभारून मार्ग काढण्याचे ठरवून संबंधित प्रशासनास पत्र व्यवहार सुरू केला असुन स्थानिक प्रशासनास गांभीर्य विषद करून दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी पनवेल येथील सहाय्यक वन संरक्षक येथे एस.एन. वाघमोडे तसेच खालापूर तालुक्याचे परीक्षेत्र वनअधिकारी राजेंद्र पवार तसेच अलिबाग येथे उप वन संरक्षक राहुल पाटील, रायगड जिल्हा निवासी उप जिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी संदेश शिर्के,सहाय्यक आयुक्त ( जिल्हा प्रशासन अधिकारी) नगरविकास शाखेचे शाम पोशेट्टी यांना भेटून निवेदन देण्यात आले आहे.
या रोडच्या कामासंदर्भात अर्कोस इंडस्ट्रियल असोसिएशन,बाँझर सोसायटी यांनी लेखी स्वरुपात स्वरूपात पाठिंबा दिलेला आहे तसेच स्थानिक ग्रामस्थ यांनी देखील सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे.लवकरच दिवाळी साजगाव यात्रा जवळ आल्याने प्रशासन उपोषणाची नोंद घेवून काम सुरू करेल तसे न केल्यास रोडचे काम सुरू होईपर्यंत आपचा लढा सुरू राहील असा आशावाद आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ.शेखर जांभळे यांनी व्यक्त केला आहे.
0 Comments