जांबरुंग ग्रामपंचायतीवर ठाकरे गट सेनेची एकहाती सत्ता

 जांबरुंग ग्रामपंचायतीवर ठाकरे गट सेनेची एकहाती सत्ता - थेट सरपंचपदी शिल्पा खांडेकर विराजमान,युवासेनेचे जिल्हा चिटणीस प्रशांत खांडेकर यांचा करिष्मा 



पाताळगंगा न्यूज : समाधान दिसले                                      खालापूर :  ८ नोव्हेंबर,

                    खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या जांबरुंग ग्रामपंचायतीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने एकहाती सत्ता मिळवत ठाकरे गटाचा करिष्मा दाखवून दिला. तर या ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाच्या शिल्पा प्रशांत खांडेकर या मोठ्या मताधिक्याने निवडून येत थेट सरपंचपदी विराजमान झाल्याने शिवसैनिक - युवासैनिक व महिला आघाडीमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.                                                                    जांबरुंग ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांना प्रतिष्ठा पणाला लावली होती, तर या निवडणुकीत युवासेनेचे रायगड जिल्हा चिटणीस प्रशांत खांडेकर यांच्या सौभाग्यवती शिल्पा खांडेकर ह्या थेट सरपंच पदाच्या व अन्य 9 सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरले असता या सर्वच्या सर्व जागेवर शिवसेनेचे शिलेदार निवडून येत ठाकरे गट शिवसेनेने करिष्मा दाखवून दिला आहे तर युवासेनेच्या जिल्हा चिटणीस प्रशांत खांडेकर यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे नऊच्या नऊ सदस्यांसह थेट सरपंच निवडून आल्याने याठिकाणी शिवसेनेने एक हातीसत्ता मिळवली आहे.                                                                                   या सर्व विजयी शिवसेनेच्या शिलेदारानचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, संपर्क प्रमुख उमेश गावंड, युवासेना उपजिल्हाधिकारी निखिल पाटील, ज्येष्ठ नेते पंढरीनाथ राऊत, भरत देशमुख, विभाग प्रमुख प्रणाल लाले, योगेश घोलप आधी प्रमुखासह शिवसैनिक - युवासैनिकांनी भेट घेत शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चौक,देवनाव्हे येथे रक्तदान शिबीर,भारतीय जनता पार्टी पुढाकार,