मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, दुधाच्या टँकरने दिली अज्ञात वाहनाला जोरदार धडक

 मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, दुधाच्या टँकरने दिली अज्ञात वाहनाला जोरदार धडक



पाताळगंगा न्यूज :  दत्तात्रय शेडगे 
खालापूर,१० डिसेंबर 

                  मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर अपघाताची मालिका सतत चालू असून आज रात्री दुसरा अपघात झाला असून एका दुधाच्या टँकरने समोरील अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात चालकाच्या पोटात टँकरचे स्टेरिंग घुसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला 
                मुबंई पुणे एक्सप्रेस वेवरून पुण्याकडून मुबंई कडे दूध घेऊन टँकर क्रमांक( MH03CV 9330) हा जात असताना  तो एक्सप्रेस वेवरील बोरघाटात आला असता त्याने समोरील अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला,यात टँकरचा केबिनचा चक्काचूर झाला असून  टँकर चालक गणेश ढगे वय( 27 रा महापे एमआयडीसी नवी मुबंई) याचा पोटात टँकरचे स्टेरिंग घुसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, 

Post a Comment

0 Comments

बेचकीच्या अचुक लक्षवेध ठरला तिसरीचा विद्यार्थी  सोहम पवार