कुंभीवली ची जलवाहीनी फुटली,रस्त्यावर निर्माण झाला पाण्यांचा झरा
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
कुंभिवली : १५ डिसेंबर,
गृप ग्राम पंचायत कुंभिवली येथिल जलवाहीनी रस्त्याच्या कडेला फुटल्यामुळे, रस्त्यावर जणू नैसगिक झरा निर्माण झाल्यांस भास या ठिकाणी प्रवास करीत असलेल्यांना भासत होते.मात्र हा नैसर्गिक झरा नसून जलवाहीनी फुटल्यांचे निदर्शनास या मार्गावरुन प्रवास करीत असलेले नागरिक ग्रामपंचायती ने केलेल्या दुर्लक्ष मुळे नाराजीचा सुर उमठत आहे.दरोज हजारो लिटर पाणी वाया जात असल्यामुळे पाण्यांचे मोल काय असते.यांची कल्पना कदाचित ग्राम पंचायत यांना नसावी
जल है ! तो हम है ! पाणी सातत्याने जपून वापरा,पाण्यांचा योग्य वापर करा,असे अवाहन सातत्याने ग्रामपंचात ग्रामस्थांना केले जात असते. मात्र गेले काही दिवस येथून सातत्याने पाणी वाया जात असून ग्रामपंचायत या कडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे ग्रामस्थांच्या मधून नाराजीचा सुर उमठत आहे. मंगलम या कारखान्याच्य जवळ आणी ,रस्त्याच्या बाजुनी ही जलवाहीनी गेलेली असल्यामुळे त्यातच या ठिकाणी सातत्याने वहानांची वर्दळ असते.याचाच फटका बसला आणी जलवाहीनी फुटली असल्यांचे ग्रामस्थांचे मत आहे.
पाणी म्हणजे आपले जिवन आहे.रणरणत्या उन्हात पाण्यांचे असलेले स्त्रोत्र तळ गाठत असतात.यामुळे पाण्यांचे दुर्भिक्ष्य मोठ्या प्रमाणात तालुक्यातील असलेल्या गावांना बसत असतात.मात्र ज्या ग्रामपंचायतीला मुबळक पाण्यांचा साठा आहे.त्यांनी पाण्यांचा नासाडी न करता.काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यांस किंवा जलवाहीनी फुटल्यांस तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे.कारण पाणी म्हणजे जिवसृष्ठी महत्वाचा गाभा आहे.यामुळे पाण्यांचा वापर योग्य वापर करुन,पाण्यांची बचत करणे ग्रामस्थ आणी ग्रामपंचात यांचे कर्तव्ये आहे.
कोट
मंगलम या कारखानाच्या जवळ आणी कुंभीवली येथे ही रस्त्याच्या बाजुला ही जलवाहीनी फुटली आहे.मात्र सातत्याने वहानांची रेलचेल असल्यामुळे काही यांचाच फटका या जलवाहीनीला बसला असून आम्ही यांचे दुरुस्तीचे काम हाती घेतले असून काही वेळातच पुर्ण होइल (गृप ग्राम पंचायत कुंभीवली ग्रामसेवक - वारे )
0 Comments