घोडीवली गावातील कुणाल पिंगळे ठरला आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेता

घोडीवली गावातील कुणाल पिंगळे ठरला आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेता




पाताळगंगा न्यूज :  समाधान दिसले
खालापूर : १५ डिसेंबर,

               रायगडचे पॉवर लिफ्टिंग म्हणून ओळख असलेले खालापूर तालुक्यातील घोडीवली येथिल  कुणाल पिंगळे यांनी एशियन पॉवरलिफ्टिंग या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारत देशातर्फे सहभागी झाला होता.यावेळी ५३ किलो वजनी गटात बहारू (मलेशिया) या ठिकाणी सुरू असलेल्या या स्पर्धेत  सुवर्णपदक प्राप्त केले केल्यामुळे त्यांचे सर्वत्र ठिकाणी कौतुक होत आहे.
                    सदर स्पर्धा १० ते १८ डिसेंबर २०२३ या कालावधीत बहारू (मलेशिया) या ठिकाणी सुरू असून  त्यांनी पटकविलेले सुवर्णपदक रायगड जिल्हा सह भारतवासीयांसाठी मान उंचवणारे ठरले आहे.यामुळे  कुणाल पिंगळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून कुणाल पिंगळे याच्या या विक्रमाने खालापूर तालुक्याच्या नावलौकिकात भर पडली आहे.
                 त्यांचे जिम संचालक प्रतीक लोखंडे (खोपोली) यांचे पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगडचे अध्यक्ष गिरीश वेदक, उपाध्यक्ष श्रीनिवास भाटे, कार्याध्यक्ष यशवंत मोकल, सहसचिव सचीन भालेराव तसेच दत्तात्रेय मोरे, माधव पंडित, संदीप पाटकर, सुभाष टेंबे, मानस कुंटे, राहुल गजरमल यांनी अभिनंदन केले आहे. तर संघटनेचे सचिव अरुण पाटकर यांनी कुणाल हा पाचवा खेळाडू रायगड जिल्हात आंतरराष्ट्रीय पदक विजेता झाला आहे असे सांगितले.
                 यावेळी तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, संपर्कप्रमुख उमेश गावंड, युवा सेना उपजिल्हाधिकारी निखिल पाटील, चिटणीस प्रशांत खाडेकर, शिवसेना उप तालुका हुसेन खान, प्रभारी शहर प्रमुख संतोष देशमुख, प्रवक्ते विलास चालके, उपशहरप्रमुख तोफिक खान, विभागप्रमुख चिंतामण चव्हाण, प्रनाल लाले, उत्तम भोईर, युवती सेना अधिकारी आदिती चालके, छाया सावंत आदी प्रमुख पदाधिकारी यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या  

Post a Comment

0 Comments

खालापूर तालुका भाजप प्रभारी मंडळ अध्यक्ष सनी यादव यांच्या संकल्पनेतून क्रिकेट सामने