खड्डेमय रस्त्याची लवकर दुरुस्ती करा - भाजपाचे चिटणीस विकास रसाळ यांची मागणी

खोपोली - कर्जत मार्गावरील वर्णे गाव आणि डोळवली, केळवली रस्त्याची दुरवस्था अवस्था

खड्डेमय रस्त्याची लवकर दुरुस्ती करा - भाजपाचे चिटणीस विकास रसाळ यांची मागणी 




पाताळगंगा न्यूज :  समाधान दिसले
खालापूर : १६ डिसेंबर,
 
             खोपोली पळसदरी मार्गे कर्जत रस्त्याची काही ठिकाणी दुरवस्था निर्माण झाल्याने याचा नाहक त्रास वाहन चालकानसह प्रवाशी वर्गाला करावा लागत आहे.  डोळवली व केळवली दरम्यान तसेच वर्णे गावाजवळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने वाहन चालकांना या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे तारेवरची कसरत म्हणावी लागेल,यामुळे खड्यामुळे लहान मोठे अपघात होत असुन संबधित अधिकारी या रस्त्याकडे दुर्लक्ष असल्याने वाहन चालकानंमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
              शासनाने लाखो रुपये खर्च करुन खोपोली पळसदरी मार्गे कर्जत रस्त्याची निर्मिती केली. या रस्त्यामुळे खोपोली - कर्जत मुख्य महामार्गाशी जोडले गेले. या रस्त्यामुळे भिवपुरी, नेरळ, बदलापुर, कल्याण आदी शहरातुन मोठ्या प्रमाणावर वाहतुक सुरु असुन डोळवली व केळवली दरम्यान तसेच वर्णे गावाजवळ रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने येथील मोठंमोठे खड्डे अपघाताला देतात आमंत्रण आहेत, तर रस्त्यावर काही ठिकाणी जागोजागी खड्डे पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. 
             अती वेगाच्या वाहनामुळे दिवसा, रात्री - अरात्री अंधारामध्ये लहान मोठे अपघात होत असल्याने हा रस्ता धोक्याची घंटा देत असून वाहन चालकांना आपला जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत असल्याने वाहन चालकांनमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या रस्त्यावरुन आजुबाजुच्या गावातील नागरिक, शाळकरी मुले याचा ही मोठ्या प्रमाणावर ये - जा असल्याने यांना ही या खड्डाशी सामना करावा लागत असल्याने हा रस्ता त्वरीत दुरूस्त करावा अशी मागणी वाहन चालकासह परीसरातील नागरिकांनी केली आहे.

चौकट - 
      डोळवली व केळवली दरम्यान तसेच वर्णे गावाजवळ रस्त्यावर पडलेले मोठंमोठे खड्डे अपघाताला आमंत्रण देत असताना, मात्र संबधित खात्याचे या रस्त्याकडे दुर्लक्ष असल्याचे पाहायला मिळत आहे. तर संबधित खात्याचे असलेले दुर्लक्ष एखाद्या वाहन चालक किंवा प्रवासी वर्गाच्या जीवाशी खेळू शकतो, त्यामुळे येथील रस्त्याची लवकर दुरुस्ती करावी जेणकरून सर्वांचा प्रवास सुखकर होईल. तर याचे गांभीर्य संबधित खात्याने न घेतल्यास भाजपा स्टाईलने आंदोलन करण्यात येईल.
( विकास रसाळ - भाजपा, खालापूर तालुका चिटणीस )

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण