एस.एम.एस.एन्व्होक्लीन बायो मेडिकल वेस्ट या कारखान्यास बोरीवली ग्रामस्थांचा विरोध

 एस.एम.एस.एन्व्होक्लीन बायो मेडिकल वेस्ट या कारखान्यास बोरीवली ग्रामस्थांचा विरोध- खासदार सुनिल तटकरे यांस निवेदन 




पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
बोरीवली : १६ डिसेंबर,

              महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत भूसंपादन झालेला प्लॉट नं. ए - दोन या जागेत येणाऱ्या जैव वैद्यकीय कचऱ्याचे विल्हेवाट लावणारा एस.एम. एस.एन्व्होक्लीन प्रायव्हेट लिमिटेड हा प्रकल्प बोरीवली येथे येत असल्यामुळे स्थानिकांनी त्यांस विरोध दर्शविला असून त्या अश्यायांचे निवेदन खासदार सुनिल तटकरे यांस दिले असून हा कारखाना या ठिकाणी येवू नये यामुळे पर्यावरण,नागरिक,शेतकरी,पाळीव प्राणी,यांस धोकादाय असल्यांचे निवेदनात म्हटले आहे.
                पाताळगंगा परिसरात बोरीवली येथे जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी  एस.एम.एस. एन्व्होक्लीन प्रायव्हेट लिमिटेड हा प्रकल्प उभारण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका व राज्य सरकारने घेतले असून तसेच या कंपनीत संदर्भात नुकताच ग्राम सभेत एकमताने ठराव मंजूर करून कंपनीला विरोध केला आहे.या कचऱ्यातून निर्माण होणारे दुर्गंधी बोरीवली गाव, ठाकूरवाडी,आदिवासी वाडी शिवाजीनगर कैरे ,वडगाव तसेच या परिसरात असणा-या  गावामध्ये पसरणार असल्यामुळे येथिल आरोग्य धोक्यात येणार असल्यांचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
             या कंपनीमध्ये मुंबई व इतर शहरातील हॉस्पिटलच्या बायो मेडिकल वेस्ट मोठ्या प्रमाणात येणार असल्यामुळे या परिसरात रोगराई वाढून मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण व जल प्रदूषण होणार आहे हे मानवी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक व धोकादायक आहे. या ठिकाणाहून पाताळगंगा नदि वाहत असून हेच पाणी शेतीसाठी,पिण्यासाठी यांचा वापर केला जात आहे.त्याच बरोबर,शेतजमिन आहे,लोकवस्ती,शाळा अदि या ठिकाणी असल्यामुळे,साहजिकच या कारखान्यांचा परिणाम यावरती होवू शकतो. 
                 हा प्रकल्प गोवंडी येथे असतांना स्थानिक तसेच न्यू संगम वेल्फेअर सोसायटी या संघटनेने मागील वर्षी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याबाबत निकाल देताना उच्च न्यायालय  १८ महिन्याच्या आत हा प्रकल्प स्थलांतरित करण्याचे आदेश दिले होते.यामुळे हा प्रकल्प बोरीवली या ठिकाणी बसणार असल्यांचे समजते.मात्र प्रकल्पाला ग्रामस्थांचा तिव्र विरोध असल्यांचे बोलले जात आहे. 



 

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण