आंबिवली येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, माफक दरात चष्मे वाटप,१३ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया

 आंबिवली येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, माफक दरात चष्मे वाटप,१३ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया 

लायन्स क्लब ऑफ शहापूर जितेंद्र कीर्तीलाल भन्साळी नेत्र रुग्णालयाचा पुढाकार 





 पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा                                  आंबिवली / माजगांव  : १७ डिसेंबर,

              छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ वाढवून नेत्र तपासणीस सुरुवात करण्यात आली.मानवाच्या शरीरातील पाच ज्ञानिद्रिये यांचे फार महत्व असून या मध्ये डोळ्यांना विशेष महत्व आहे. आपले डोळे उत्तम नसेल तर आपण ही सृष्ठी पाहू  शकत नाही.डोळे म्हणजे आपले जिवन हे साध्य डोळ्यासमोर ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना उपतालुका अधिकारी मंगेश पाटील, प्रदीप जाधव - राजेश पाटील - बूथ प्रमुख,संदेश दत्तात्रेय जाधव यांच्या संकल्पनेतून शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.       



     
                      
    लायन्स क्लब ऑफ शहापूर जितेंद्र कीर्तीलाल भन्साळी नेत्र रुग्णालय यांच्या माध्यमातून भैरवनाथ मंदिर आंबिवली येथे ही तपासणी करण्यात आली.यावेळी या परिसरातील रुग्णांनी आपले नेत्र तपासणी करुन घेतले. ज्या रुग्णांना अंधुक दिसत असेल अथवा ज्यांचे डोळ्यांचे ऑपरेशन करावयाचे असेल तर विनामूल्य केले जाईल. या विचारांतून प्रत्येकांनी,आपले नेत्र तपासणी केली.डॉ. जितेंद्र नेवरेकर,डॉ.वैष्णवी तेटगुरे यांच्या माध्यमातून ही तपासणी करण्यात आली.असून १३ रुग्णांची डोळ्यांची शस्त्रक्रिया शहापूर येथील हॉस्पिटल येथे केले जाईल     



 
                                                                                   यावेळी गृप ग्राम पंचायत उपसरपंच राजेश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती खालापूर सभापती - जयवंत पाटील, मा. उपसरपंच अनंता लभडे,शिवसेना नेते उत्तम भोईर विलास कांबळे, सामाजिक कार्यकर्ते - नरेश पाटील, अविनाश कांबळे, रमेश जाधव, रणधीर पाटील,किशोर पाटील,शशिकांत ढवालकर, अरुण काठावले,  यशवंत शिंदे, मारुती ढवालकर, उपस्थित होते. तसेच शिवसेना शाखा आंबिवली चे शिवसैनिक अशोक जाधव, शांताराम ठोंबरे, संजय जाधव, संदीप जाधव चंद्रकांत जाधव, गोपीनाथ पाटील, रमा जाधव, भूषण जाधव, दीप जाधव, अतुल लभडे यांनी विशेष प्रयत्न केले. 


Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर