स्वातंत्र्य वीर सावरकरांचा अवमान खोपोली शहर भाजपाच्या वतीने निषेध
पाताळगंगा न्यूज : हनुमंत मोरे
खोपोली / वावोशी : ८ डिसेंबर
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र, कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी
स्वातंत्र्यवीर सावरकरांचं योगदान काय? आणि त्यांचा पराक्रम काय? असं विचारून खर्गेंनी संपूर्ण देशभक्तांचा अपमान केल्याने सर्वच स्तरातून संताप व्यक्तकेली जात आहे.खोपोली शहर भाजपच्या वतीने बाजार पेठेतील दिपक चौकात निदर्शेने घोषणा देत करीत खर्गेचा निषेध करणयात आला.
काँग्रेसने स्वातंत्र्य वीर सावरकर यांचा अवमान करण्याची एकही संधी सोडली नाही. आधी राहुल गांधी आणि आता खर्गे सावरकरांवर टीका करताहेत पण या देशातील जनता स्वातंत्र्यवीरांचा अवमान कधीच सहन करणार नाही.मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत दादा ठाकुर व भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांचा आदेशाने शहर भाजपा अध्यक्ष रमेश रेटरेकर यांचे नेतृत्वाखाली शहरातील दिपक चौकात बाजारपेठेत खर्गेचा निषेध करीत जोरदार घोषणा बाजी करिता निर्देशने करण्यात आले.
यावेळी सरचिटणीस राहुल जाधव, महिला मोर्चा उत्तर रायगड जिल्हा चिटणीस अश्विनी अत्रे, सुप्रिया नांदे, शहर उपाध्यक्ष दिलीप पवार, ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक सुर्यकांत देशमुख, कर्जत विधान सभा विस्ताराक हेमंत नांदे, भटक्या विमुक्त आघाडी अध्यक्ष संतोष लोहार, वैद्यकीय कोकण विभाग उपाध्यक्ष डॉ. बबन नागरगोजे, जैन प्रकोष्टचे किर्ती ओसवाल, लालजी मिश्रा, हेमंत भाटिया आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments