गुरुकुल आंतरराष्ट्रीय शाळेत ऑलिम्पिक २०२३ चे उद्घाटन

 गुरुकुल आंतरराष्ट्रीय शाळेत ऑलिम्पिक २०२३ चे उद्घाटन 



पाताळगंगा न्यूज : हनुमंत मोरे
खोपोली / वावोशी : ८ डीसेंबर 
       
           नवी मुबंई चौक येथील श्री स्वामीनारायण गुरुकुल आंतरराष्ट्रीय शाळेत ऑलिम्पिक २०२३ चे उद्घाटन गुरुवार दि.७ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता मोठ्या उत्साहात झाले.
            या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून इंडिया बुक ऑफ  रेकॉर्डस प्राप्त करणारे आणि ४०० हुन अधिक धावण्याच्या स्पर्धेत भाग घेऊन भारत देशाचं नाव उंचावणारे अनिल शिवप्पा कोरवी सर तर हॉलीबॉल चे राष्ट्रीय खेळाडू तथा रिलायन्स फाऊंडेशन स्कुल चे शारीरिक शिक्षक लक्ष्मण चालगले सर तसेच रिलायन्स फाऊंडेशन स्कुल चे  सर्वोत्कृष्ट शारीरिक शिक्षक अजय पाटील सर,व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक पटेल व उद्योजक बाळा जांभळे उपस्थित होते.

          श्री स्वामीनारायण गुरुकुल नवी मुबंई चे संचालक परमपूज्य विश्वमंगलदास स्वामीजी व ब्रम्हस्वरूप स्वामीजी यांनी विद्यार्थ्यांशी बोलताना सांगितले की आपल्या आयुष्यात अध्यात्मिक जीवनाचे काय महत्व आहे यावर अधिक सर्वोत्तम मार्गदर्शन केले.याशिवाय त्यांनी बाहेरील शाळेतून आलेल्या विद्यार्थ्यांना गुरुकुलचं महत्व सांगितले.गुरुकुल मध्ये विद्या,सदविद्या व ब्रम्हविद्या शिकवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केला जातो.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले अनिल कोरवी सरांनी सांगितले की आयुष्यात हार कधी नका मानू, प्रयत्न करीत रहा,यशस्वी नक्की व्हाल.पुढे राष्ट्रीय खेळाडू लक्ष्मण चालगले सरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हटलं की आयुष्यात तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा,पहिली आम्ही का खेळतो,अर्थात याच उत्तर आहे मैत्रीसाठी.दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही कुठे पण जाऊ तिथे सर्वोत्तम खेळ करू आणि तिसरी गोष्ट आम्ही जेवढे प्रयत्न करू ते मोठ्या आनंदाने करू असं प्रेरणादायी वक्तव्य केले.

          यावेळी सर्व शाळेतून आलेल्या विद्यार्थ्यांनी मशाल हातात घेऊन संपूर्ण मैदानात फेरी मारून आपलं खेळांबद्दल असलेले प्रेम व्यक्त केले.ऑलिम्पिक २०२३ च्या पहिल्याच दिवशी खूप साऱ्या स्पर्धा संपन्न झाल्या.यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून श्री स्वामीनारायण गुरुकुल नवी मुबंई चे मुख्याध्यापक डॉ.पी. हरिबाबू रेड्डी सर,गुरुकुल सर्व शिक्षक वर्ग,विद्यार्थी वर्ग,पालक वर्ग व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुकुल चे हिंदी विषयाचे शिक्षक राम कृष्ण शुक्ला सरांनी केले.

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण