मुबंई पुणे एक्सप्रेसवेवर खाजगी बसने दिली कंटेनरला दिली जोरदार धडक,चालक ठार १० प्रवाशी जखमी

 मुबंई पुणे एक्सप्रेसवेवर खाजगी बसने दिली कंटेनरला दिली जोरदार धडक,चालक ठार १० प्रवाशी जखमी 




पाताळगंगा न्यूज : दत्तात्रय शेडगे 
खालापूर : १० डिसेंबर 

                  मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर आज रात्री दोन वाजण्याच्या सुमारास  एका खाजगी बसने समोरील कंटेनरला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात बस मधील चालक याचा जागीच मृत्यू झाला तर १०  प्रवाशी जखमी झाले आहेत, 
               मुबंई पुणे एक्सप्रेस वेवरून वैभव ट्रॅव्हलची बस प्रवाशी घेऊन मुबंई ते कोल्हापूर अशी जात असताना  ती एक्सप्रेस वेवरील  बोरघाटात आडोशी बोगद्याजवळ  आली असता चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने बसने समोरील कंटेनरला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघात बस मधील चालक राजू गावडे (वय 40) रा सांगली याचा जागीच मृत्यू झाला तर बस मधील १०  प्रवाशी जखमी झाले असून त्यांना तात्काळ लोकमान्य टिळक हॉस्पिटल पुणे  आणि काहींना एमजीएम  हॉस्पिटल कळंबोली   येथे उपचारासाठी हलविण्यात आले. 
              या अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस, बोरघाट पोलीस, आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्सचे जवान, महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान, अपघातग्रस्त टीमचे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल होत बस मध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले, 
               या अपघातात बस आणि  कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बस क्रेनच्या साहाय्याने बाजूला घेऊन वाहतुकीसाठी रस्ता सुरळीत करण्यात आला,

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण