राष्ट्रीय गणित दिवस साजरा,तीनशे दोन विद्यार्थी समवेत अठरा शिक्षकांचा सहभाग
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
चिलठण : २३ डिसेंबर,
दरवर्षी २२ डिसेंबर हा राष्ट्रीय गणित दिवस देशभरात साजरा केला जात असल्यामुळे प्रथम एज्यूकेशन फाउंडेशन संचालित आणि अप्लाईड मटेरियल सहयोगाने बाल विज्ञान शोधिका चीलठण अंतर्गत जिल्हा परिषद शाळा नारंगी, सावरोली, ठाणेन्हावे,जांबरुंग.या शाळेमध्ये राष्ट्रीय गणित दिन साजरा करण्यात आला.यावेळी तीनशे दोन विद्यार्थी समवेत अठरा शिक्षकांनी सहभाग घेतला.
गणित दिन साजरा करण्यामागे मुख्य उद्देश म्हणजे लोकांमध्ये गणित विषयाचे महत्त्व आणि उगम याची जाणीव करून देण्यासाठी २२ डिसेंबर हा दिवस 'श्रीनिवास रामानुजन' यांच्या कार्यांना ओळखण्यासाठी प्रामुख्याने हा दिवस साजरा केला असतो.यावेळी विद्यार्थ्यांनी गणित प्रतिकृती द्वारे, क्रिया व्यवस्थित सादर करून माहिती दिली.
या कार्यक्रमास शाळांचे मुख्यद्यापक- शिल्पा पाटील- नारंगी शाळा, जयंत पाटील - ठाणेन्हावे, बळीराम चव्हाण-सावरोली, जगदेवी सोनटके-जांबरुंग शाळा यांच्या समवेत सर्व शिक्षक वर्ग व सहकारी तथा प्रथम चे सहकारी सेंटर इंचार्ज- रणजित वाघमारे, विज्ञान मित्र -अश्विनी भगत, विजय वानखडे आणि पूजा भोईर यांच्या सहकार्यातून हे कार्यक्रम पार पाडले गेले.
0 Comments