खालापूर तालुक्यातील शिवसेना उबाठा पदि महिलांची नियुक्ती

शिवसेनेच्या रंजना राणेची विधानसभा संघटकपदी, रेश्मा कदमची संपर्क संघटकपदी तर वैजयंती गायकवाड यांची संघटकपदी निवड ,

युवती सेना तालुका सचिवपदी श्रुती मोरे ह्यांची निवड




पाताळगंगा न्यूज  : समाधान दिसले
खालापूर : ३० डिसेंबर,

          शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे - युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशाने व रायगड जिल्हा संपर्क संघटक किशोरीताई पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाने तसेच रायगड जिल्हा संघटिका सुवर्णा जोशी आणि उपजिल्हा संघटिका अनिता पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रंजना राजेंद्र राणे विधानसभा संघटकपदी, रेश्मा रवींद्र कदम यांची खालापूर तालुका संपर्क संघटकपदी तर वैजयंती रमेश गायकवाड यांची तालुका संघटक पदी तसेच युवती सेना तालुका सचिवपदी श्रुती मोरेची नियुक्ती करण्यात आल्याने सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
                  यावेळी जिल्हा संघटिका सुवर्णा जोशी, उपजिल्हा संघटीका अनिता पाटील, विधानसभा संपर्क संघटक सुविधा विचारे, युवती सेना तालुका अधिकारी भारती लोते, शहर संघटक किशोरी शिगवण, संपर्क संघटक कविता पाटील, छाया सावंत, युवती सेना शहर अधिकारी आदिती पवार आदि प्रमुखासह महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
                   शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मजबूत करण्यासाठी खालापूर तालुक्यात महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली असता त्यांच्या पक्ष वाढीच्या कामाची दखल घेत नुकतीच रेश्मा कदम यांची खालापूर तालुका संपर्क संघटकपदी, वैजयंती गायकवाड यांची संघटकपदी युवती सेना तालुका सचिवपदी श्रुती मोरे, विधानसभा संघटकपदी रंजना राणे, सावरोली शाखा संघटकपदी संचिता बारड, खरसुंडी शाखा संघटकपदी रिया मालुसरे, युवती सेना वडगाव विभाग प्रमुखपदी प्रणाली धामोसे, होराळे ग्रामपंचायत संघटकपदी सुरेखा दळवी, होनाड युवती सेना संघटकपदी मीना भोर्डे आदींची विविध पदावर नियुक्ती करण्यात आल्याने या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना त्या आशयाचे नियुक्तीपत्र रायगड जिल्हा संघटिका सुवर्णा जोशी, उपजिल्हा संघटिका अनिता पाटील यांच्या हस्ते देण्यात आले असता सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण