धनगर आरक्षणासाठी आत्महत्या करण्याऱ्या रमेश फुले यांच्या कुटूंबाला आर्थिक मदत द्या -आमदार गोपीचंद पडळकर

 धनगर आरक्षणासाठी आत्महत्या करण्याऱ्या रमेश फुले यांच्या कुटूंबाला आर्थिक मदत द्या -आमदार गोपीचंद पडळकर 




पाताळगंगा न्यूज :  दत्तात्रय शेडगे 
खालापूर : २९ डिसेंबर,

                 धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लातूर जिल्ह्यातील रमेश फुले यांनी आत्महत्या केली , त्यांच्या कुटूंबाला २५ लाखांची आर्थिक मदत मिळावी आणि कुटूंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत समावून  घ्यावे अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
             धनगर समाजाला (एस टी चे सर्टिफिकेट) धनगर आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून समाजाचा  संघर्ष चालु असून उपोषण, रस्ता रोको, जेल भरो, अशी अनेक आंदोलन करीत आहेत तरी एकही सरकारने धनगर आरक्षणाकडे गांभीर्याने घेतले नाही, यासाठी लातूर जिल्ह्यातील  धनगर तरुण रमेश फुले यांनी नैराश्यातुन नुकतीच आत्महत्या केली.
                 त्यांच्या कुटुंबीयांची आमदार गोपीचंद पडळकर यांनी भेट घेतली, तर फुले यांच्या कुटुंबियाला २५ लाखांची आर्थिक मदत देऊन कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी सामावून घेण्याचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. 

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर