दिपोत्सवाच्या माध्यमातून नावंढे येथिल अखंड हरिनामांची सांगता

 दिपोत्सवाच्या माध्यमातून नावंढे येथिल अखंड हरिनामांची सांगता 



पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
नावंढे : १ जानेवारी 

            रायगड भूषण गुरुवर्य ह.भ.प.तानाजी महाराज कर्णुक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ग्रामस्थ, या परिसरातील भाविकांच्या सहकार्य संपन्न होत असलेला अखंड  ज्ञान,जप यज्ञ, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा,भैरवनाथ मंदिर नावंढे येथे दिपोत्सवाच्या माध्यमातून सांगता करण्यात आली.ह्या सोहळ्यांचे आठ वर्ष असून रोज नित्यनेमाने काकडा,भजन,प्रवचन सामुदायिक पारायण,तसेच किर्तनांचे आयोजन करण्यात येत होते.
                     ग्रामस्थ,महिला मंडळ,तरुण वर्ग,महिला बचत गट,नावंढे तसेच वाडी येथिल ग्रामस्थ एकत्र येवून अखंड हरीनाम हा उत्साहाने आणि भक्ती भावने साजरा करण्यात येत होता. रायगड भूषण गुरुवर्य ह.भ.प.तानाजी महाराज कर्णुक यांच्या शुभहस्ते दीपोत्सव करण्यात आले.यावेळी सामाजिक,सांस्कृतीक,शैक्षणिक, राजकिय अशा विविध क्षेत्रातील  मान्यवर व्यक्ती आणि वारकरी संप्रदाय येथील थोर कीर्तनकार, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी  दीप प्रज्योलीत करून आणि ज्ञानेश्वराच्या पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
              गेले चार दिवस अखंड,भजन,क़िर्तनाच्या माध्यमातून या ठिकाणी चैतन्य निर्माण झाले.दीपोत्सव दिवशी गावातून भव्य - दिव्य,पायी पाळखी दिंडी सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले होते.तसेच काल्यांचे किर्तन रायगड भूषण गुरुवर्य ह.भ.प.तानाजी महाराज कर्णुक यांचे झाले.काल्याचा महाप्रसाद ग्रामस्थ मंडळ नावंढे यांच्या माध्यमातून देण्यात आले.


  

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण