आर्यन प्रीमियर लीग स्पर्धेचा दिमाखदार प्रारंभ
पाताळगंगा न्यूज : हनुमंत मोरे
खोपोली / वावोशी : १५ डिसेंबर,
खालापूर तालुक्यातील नामांकित आर्यन फ्रेंड्स फॉउंडेशन कला, क्रीडा, सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वामुळे फॉउंडेशन सलग १२ व्या वर्षी आर्यन प्रीमियर लीग ही रायगड जिल्ह्यातील नामांकित क्रिकेट स्पर्धेला आज सुरूवात झाली.या स्पर्धेचे उद्घाटन सकळ मराठा समाजाचे राज्य समन्वयक सुनील पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी आर्यंन फ्रेंड्स चे माजी अध्यक्ष एम.डी.चाळके,वडवळ ग्राम पंचायतीचे माजी सरपंच जितेंद्र सपकाळ,संस्थेचे विद्यमान अध्यक्ष जगदीश मरागजे आदी अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१४ डिसेंबर ते १७ डिसेंबर या कालावधीत वडवळ येथील भव्य मैदानावर आयोजित केलेल्या या स्पर्धेला रायगड,ठाणे व पालघर या तीन जिल्ह्यातील खेळाडूंची उपस्थिती पाहून प्रेक्षकांना आनंद झाल्याचे पहायला मिळाले.फॉउंडेशन चे अध्यक्ष जगदीश मरागजे आणि त्यांची कार्यकारिणी सदस्यांनी सदरची स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथक मेहनत घेतली आहे.फॉउंडेशन च्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या विविध सामाजिक, कला,क्रीडा क्षेत्रातील,मान्यवरांचे या प्रसंगी स्वागत आणि सन्मान करण्यात आला.
आलेल्या प्रत्येक पाहूण्यांचे स्वागत करण्यात येत होते.या सर्व पाहूण्यांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.रायगड-ठाणे-पालघर या तीन जिल्ह्यात विखुरलेल्या कोयना समाजातील उदयनमूख खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरिता अशा प्रकारच्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सकळ मराठा समाजाचे राज्य समन्वयक डॉ.सुनील पाटील,जितेंद्र सकपाळ, सुभाष सावंत,विष्णुजी सावंत,सुरेश चाळके,अनिल मरागजे,एम डी चाळके (जेष्ठ मार्गदर्शक ए एफ एफ), अनिल सावंत (स्पर्धा प्रमुख २०२३),गोरठण ग्राम पंचायतीचे माजी सरपंच प्रमोद जाधव, पत्रकार हनुमंत मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments