मा. महापौर, भिकू वाघेरे सामाजिक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून पत्रकारांचा सन्मान

 मा. महापौर, भिकू वाघेरे सामाजिक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून पत्रकारांचा सन्मान 





पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
खालापूर : ८  जानेवारी,

              मराठी भाषेचे आद्य पत्रकार आणि दर्पण या मराठी मधील पहिल्या वृत्तपत्राचे संस्थापक बाळशास्त्री  जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने,अर्थात पत्रकार दिनांचे औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मा. महापौर संयोग वाघेरे,व भिकू वाघेरे सामाजिक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून बागेश्री रेस्टारंट येते पत्रकारांना वही आणी पेन पुष्प देवून सन्मानित करण्यात आले.यावेळी खालापूर,कर्जत,पनवेल,उरण या तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.यावेळी सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आले.
             यावेळी भिकू वाघेरे - पाटील सामाजिक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून मा. माहापौर - पिंपरी चिचंवड संजोग वाघेरे - पाटील यांच्यावर नुकताच मावळ लोकसभा संघटना पदाची जबाबदारी देण्यात आली.त्यांचे वडील सरपंच पदापासून विविध पदे भुषविली असल्यामुळे वयाच्या बावीस वर्षापासून राजकीय क्षेत्रात पदार्पण केले,आणी ते नगरसेवक म्हणून निवडून आले १९८५ - ८६ या काळात ते माहापौर हे पद भुषविले होते,दांगडा अनुभव आणी समाज सेवा करण्यांची जिद्द यामुळे अल्प वधीतच ते नावारुपाला आले.विविध विकास कामे करुन या शहराचा काया पालट केले.
              कोरोना काळात विविध उपक्रम राबवून त्यांनी प्रत्येकांच्या मनामध्ये आपले घर केले,गेली ३८ वर्ष प्रतिष्ठांच्या माध्यमातून समाजसेवा करीत असतांना   त्यांच्या मध्ये असलेली कामाची आवड पहाता त्यांस कर्जत,खालापूर,उरण,पनवेल ह्या तालुक्यातील आमदार निवडून आण्यांची जाबाबदारी त्याच्यावर देण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यावरांनी पत्रकार दिनांचे औचित्य साधून पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.
                   यावेळी तालुका प्रमुख -  एकनाथ पिंगळे,उप जिल्हा प्रमुख -  नितीन दादा सावंत, जिल्हा परिषद सदस्य - मोतीराम ठोंबरे,विभाग प्रमुख - प्रफुल्ल विचारे ,शिवसेना नेते - श्यामभाई साळवी,सचिन मते - चौक ,आदमी पार्टी - शेखर जांभळे ,पंकज रुपवते,पिंपरी चिंचवड - स्वप्नील सुर्वे ,नगरसेवक -  नितीन मोरे,संपर्क प्रमुख पनवेल-  वैभव सावंत, मावळ संपर्क प्रमुख-  प्रभाकर पवार,विकास चालके, पनवेल तालुका प्रमुख - ज्ञानेश्वर बडे,पनवेल तालुका प्रमुख - संदीप तांडेल, युवा सेना कर्जत- प्रथमेश मोरे,संतोष देशमुख - खोपोली, मा.सरपंच वानिवली -  सुनील थोरवे,अदि शिवसेनेचे नेते उपस्थित होते.



 
 

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर