रुग्णांच्या डोळ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया, युवासेना उपतालुका अधिकारी मंगेश पाटील यांचा पुढाकार

 रुग्णांच्या डोळ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया, युवासेना उपतालुका अधिकारी खालापूर - मंगेश पाटील यांचा पुढाकार


पाताळगंगा न्यूज ; वृत्तसेवा  
माजगांव ,आंबिवली  : ८  जानेवारी 

                  शिवसेना ( उबाठा ) युवासेना उपतालुका अधिकारी खालापूर व स्मितसंकल्प स्टेशनरी आंबिवली यांच्या माध्यमातून श्री भैरवनाथ मंदिरामध्ये मोफत नेत्राचिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आले.यावेळी काही रुग्णांस मोतीबिंदू झालेल्या निदर्शनास आले.यावेळी शहापूर येथील जितेंद्र कीर्तीलाल भंसाळी नेत्र रुग्णालय येथे मोफत शस्त्र क्रिया करण्यात आली.
                  या शिबिरामध्ये जवळपास अनेक  व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घेतला. लायन्स,क्लब शहापूर,भुमिदाता लक्ष्मीबाई काशिनाथ गुजराती  येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या, शिवसेना,युवासेनेच्या माध्यमातून राबविलेल्या या कार्यक्रमासाठी राजेश जगन्नाथ पाटील यांनी विशेष मेहनत घेतली. युवासेना उपतालुका अधिकारी खालापूर, मंगेश पाटील  यांच्या नियोजनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
                   यावेळी उबाठा शिवसैनिक अशोक जाधव, शाखाप्रमुख चंद्रकांत जाधव, उपविभाग प्रमुख संजय जाधव, भरत जाधव, सुनील पाटील, संदीप जाधव, चंद्रकांत जाधव, प्रदीप जाधव, शांताराम ठोंबरे, रमेश जाधव, रमाकांत रामकृष्ण जाधव,संदेश द. जाधव यासह इतर शिवसैनिक व युवसैनिक यांनी सहकार्य केले.रुग्णांना मोफत आणि तत्पर सेवा मिळाल्याबद्दल सर्वांनी यांचे आभार मानले.


Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर