कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडीया लि.कामगारांचे उपोषण सुटले,व्यवस्थापक यांनी अटी केल्या मान्य

 कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडीया लि.कामगारांचे उपोषण सुटले,व्यवस्थापक यांनी अटी केल्या मान्य




पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
पौद : २३  फेब्रुवारी,

               पौद येथे असलेला कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडीया लि.या कारखान्यातील व्यवस्थापक ह्यांनी कामगार कपात आणी दोन महिने पगारा पासून वंचित ठेवल्यामुळे येथिल कामगारांनी गेट समोर साखळी उपोषण मार्ग स्विकारला,मात्र गेले आठ दिवस येथे आंदोलन सुरु असतांना व्यवस्थापक यांनी समंजसपणा घेवून आणी कोकण श्रमिक संघ,संलग्र हिंद मजदूर सभा महाराष्ट्र कौन्सिल जनरल सेक्रेटरी  श्रुतीताई श्याम म्हात्रे यांच्या मध्यस्ती मुळे आज साखळी उपोषण कारणा-या ज्युस देवून सांगता करण्यात आली.
              गेली आठ दिवस हा लढा सुरु असतांना सामाजिक,राजकीय पदाधिकारी ग्रामस्थ ग्रुप ग्राम पंचायत माजगांव सरपंच,उप सरपंच,सदस्य,आजी ,माजी सरपंच,पोलीस पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष,महिला मंडळ,खालापूर तालुक्यातील व पंचक्रोशीतील ग्रामस्थ,या उपोषण कारणा-या कामगारांचा मनोबल वाढविण्याचे प्रयत्न करीत होते.अखेर व्यवस्थापक आणि युनियनच्या मध्यस्तीने कामगारांचे उपोषण सुटले असून कामगारांच्या मागण्या मान्य झाल्या आहेत.त्याचबरोबर कोणत्याही कामगारांची कपात करणार नसल्याचे व्यवस्थापक यांनी तसे लिहून देऊन स्वाक्षरी करण्यात आली.त्याचबरोबर दोन महिने रखडलेला कामगारांचा पगार त्यांच्या खात्यात टाकणार असल्याचे सांगण्यात आले.
                   कामगारांच्या या साखळी उपोषणांच्या पुर्णविराम देण्यासाठी  या परिसरातील ग्रामस्थ तसेच राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.युनियनच्या सेक्रेटरी श्रुतीताई श्याम म्हात्रे यांनी कंपनी मध्ये झालेल्या करार नामा वाचून दाखविले.असून त्यांस आपली सहमती असून कोणत्याही कामगारावर अन्याय होणार नाही.असे व्यवस्थापक  एच आर व्यवस्थापक - रमेश देशमख ,वाय.आर.शेखर, के.एन.प्रसाद सांगितले.यावेळी कामगार म्हणून संतोष भोईर,संदिप काठावले,दत्तात्रेय गरुडे,रणधीर पाटील,प्रमोद काठावले,दिपक जाधव,अरुण भोईर,रोहीणी टेंभे या ठिकाणी उपस्थित होते.
                              
            

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण