खालापूर तालुक्यात अजित दादा पवार गटाला धक्का..खरिवली ग्रामस्थ व खरिवली आदिवासी वाडी येथील कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश

 खालापूर तालुक्यात अजित दादा पवार गटाला धक्का..खरिवली ग्रामस्थ व खरिवली आदिवासी वाडी येथील कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश





पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
खालापूर : २२ फेब्रुवारी,

             मा.आमदार सुरेशभाऊ लाड व मा.जिल्हा परिषद सभापती नरेश पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर खालापूर तालुक्यात भारतीय जनता पक्षात असंख्य कार्यकर्त्यांचा सातत्याने पक्ष प्रवेश सुरु असल्याने कर्जत खालापूर मधील राजकीय समीकरण बदलू लागली आहेत.त्यामुळे कर्जत खालापूर विधासभेत भाजप सर्वात प्रबळ पक्ष म्हणून प्रस्थापित होत आहे.
            मा.आमदार सुरेशभाऊ लाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मा.जिल्हा परिषद सभापती यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत खरिवली गावातील व आदिवासी वाडीतील असंख्य कार्यकर्ते यांनी नरेश पाटील आणि प्रभाकर पाटील, प्रवीण मनवे, भरत महाडिक, निकिता हेलंडे, राकेश जाधव, तेजस घारे यांच्या पुढाकारातून आज कर्जत येथे भारतीय जनता पक्ष कार्यालयात जाहीर प्रवेश करण्यात आला.
             ह्यावेळी विष्णू रामचंद्र पाटील मा.सरपंच, बाळाराम रामचंद्र परबलकर माजी सरपंच,काशिनाथ पाटील, शिवाजी पाटील,मिनेश पाटील, निलेश डिघे,बाळकृष्ण तळकर,समीर परबलकर, नरेश परबलकर, संजय महाडिक, संदीप परबलकर, अनिल परबलकर, शुभम परबलकर, शिवाजी परबलकर, सुनील परबलकर, किशोर पाटील, उपेश पाटील, संतोष पाटील गोठीवली, संताजी परबलकर, संजय हेलंडे, विश्वास पाटील, विकी पवार, संजय जाधव, विजय जाधव, विजय जाधव, कृष्णा जाधव, नितीन वाघमारे, अजय पवार, सागर वाघमारे, मारुती जाधव, समीर जाधव, मंगेश वाघमारे, रोहिदास पवार, कान्हू पवार, हरिचंद्र वाघमारे, भाऊ वाघमारे, गोपाळ वाघमारे, महादू वाघमारे, शुभम पवार, अशोक वाघमारे, भिवसेन पवार, चंदर वाघमारे, पिंटू पवार, राम पवार, दिपक पवार आदी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
                  ह्यावेळी कर्जत खालापूर विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे, दिपक बेहरे सरचिटणीस रायगड जिल्हा भाजपा, सनी यादव उपाध्यक्ष रायगड जिल्हा, शरद लाड माजी नागराध्यक्ष कर्जत, प्रसाद पाटील कर्जत खालापूर विधानसभा युवा मोर्चा संयोजक, निकिता हेलंडे, दिपक जगताप खालापूर शहर अध्यक्ष,उत्तर रायगड किसान मोर्चा कोषाध्यक्ष रुमाजी मोरे,सुनील सुखदरे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपास्थित होते.

Post a Comment

0 Comments

बांधकामंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त चौकमध्ये रक्तदान शिबिर, सरपंच रितू ठोंबरे यांनी केले रक्तदान