ओम साई हॉस्पीटल मध्ये दिपक शंकर पोपेटे तरुणाचा मृत्यू,नातेवाईक संतप्त

 ओम साई हॉस्पीटल मध्ये दिपक शंकर पोपेटे तरुणाचा मृत्यू,नातेवाईक संतप्त 





पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
खालापूर : २१ फेब्रुवारी,


            आज तरुण वर्गामध्ये हद्यविकारांचे झटके येण्यांचे प्रमाण वाढले आहे.मात्र काही व्यक्ती या कडे दुर्लक्ष करीत असतात.तर काहींना वेळेवर उपचार मिळाल्यामुळे किंवा काही वेळा डॉक्टरांच्या हळगर्जी पणामुळे जिव गमवावे लागत आहे.असाच काही प्रकार नाणीवली येथिल दिपक शंकर पोपेटे  वय ४० या तरुण बरोबर घडला आहे.त्यांच्या छतीमध्ये दुखद असल्यामुळे चौक बाजार पेठेतील ओम साई हॉस्पीटल येथे ॲडमिट करन्यात आले.मात्र व्यवस्थित निधान न झाल्यामुळे आणी डॉक्टरांच्या हळगर्जी पणा मुले त्यांना अपला जीव गमवावा लागला असल्यांचा आरोप त्यांच्या नातेवाईक यांनी केला.असल्यामुळे काही काळ तणावांचे वातावरण निर्माण झाले होते.
               ओम साई हॉस्पीटल चे डॉ. अच्चुत  हाडकुळे यांनी ई.सी.जी करून,सलाईन लावली,पण ई सी जी चा रिपोर्ट रुग्णांसाठी उत्तम नसल्यांचे नातेवाईकांचा आरोप असल्यांचे समजते.त्याच बरोबर  रुग्णांची तपासणी करण्यास डॉक्टर आणि यंत्रणा सक्षम नसल्याने पुढील उपचार करण्यासाठी इतरत्र पाठवणे आवश्यक होते, तसे न करता डॉक्टर स्वत उपचार करुन, झोपी गेले.असे रुग्णांच्या नातेवाईक प्रतिनीधी बोलतांना सांगितले.
              त्याच बरोबर उपस्थीत असलेले डॉक्टर हे नशा  करून होते असाही आरोप करण्यात आला आहे.त्यामुळे डॉ.अच्युत यांची वैद्यकिय तपासणी सरकारी आणि खासगी अशी करण्यात आली आहे. डॉ.बी.ए.एम.एच आहेत. मात्र दवाखान्यात कुठेही डॉक्टर यांची नावे आणि त्यांच्या वैद्यकिय पदवीचा बोर्ड नसल्यांचे सांगितले जात आहे.यामुळे काही काळ वातावरण तापले असल्यांचे पहावयांस मिळाले. चौक येथिल पोलीस वेळेवर दवाखान्यात पोहचले आणी जमावांना शांत केले. सध्या डॉ.अच्युत यांना चौक पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले असून मृतदेह पोस्टमार्टम साठी पाठविण्यात आले असून मृताचा वैद्यकिय अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल,असे चौक पोलीस यांच्याकडुन सांगण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments

बांधकामंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त चौकमध्ये रक्तदान शिबिर, सरपंच रितू ठोंबरे यांनी केले रक्तदान