जिल्हास्तरीय कब्बडी स्पर्धांचे आयोजन, महिला आणि पुरुषांच्या कब्बडी स्पर्धांचे आयोजन ,धनगर समाज कल्याणकारी संस्थेचा स्तुत्य उपक्रम....
पाताळगंगा न्युज : दत्तात्रय शेडगे
खालापूर : ३ एप्रिल,
धनगर समाज कल्याणकारी संस्था रोहा तळा मुरुड यांच्या वतीने जिल्हास्तरीय महिला आणि पुरुषांच्या कबड्डी स्पर्धांचे आयोजन केले असून या स्पर्धा शनिवार १३ एप्रिल २०२४ रोजी दुपारी २ वाजता बायपास रोड दर्गा शेजारी रोहा येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.
कल्याणकारी धनगर समाज संस्था रोहा तळा, मुरुड यांच्या वतीने प्रथमच धनगर समाजातील महिलांच्या आणि पुरुषांच्या रायगड जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून या कब्बडी स्पर्धेला धनगर समाजाच्या प्रत्येक गावातून महिलांचा आणि पुरुषांचा संघाने सहभाग घ्यावा असे आवाहन कल्याणकारी धनगर समाज संस्था रोहा तळा, आणि मुरुड संस्थेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत शिंगाडे यांनी केले आहे.
0 Comments