गारभट धनगरवाड्याचा रस्ता परवानगी नुसारच ,कोणत्याही प्रकारची झाडांची कत्तल झाली नाही ,रस्त्याच्या कामात अडथळा आणण्याचे विरोधकांचे काम जिल्हाध्यक्ष ॲड - संतोष आखाडे
पाताळगंगा न्युज : दत्तात्रय शेडगे
खालापूर : ३ एप्रिल,
माथेरानच्या पायथ्याशी आलेल्या गारभट धनगरवाड्याच्या रस्त्याचे काम चालू केले असून या रस्त्याला वनविभागाची परवानगी घेऊन कायदेशीर रित्या काम करत असल्याचा दावा हर हर चांगभले धनगर समाज संस्थेचे रायगड जिल्हाध्यक्ष ॲड संतोष आखाडे यांनी केला आहे ,
माथेरानच्या पायथ्याशी हा धनगरवाडा असून येथे ७० ते ७५ घरे असून ३०० लोकसंख्या आहे, मात्र देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष उलटली मात्र हा गाव विकासापासून कोसो दूर आहे, मात्र आमदार महेश बालदी , बोरगावचे सरपंच प्रवीण मोरे यांच्या सहकार्याने पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून ह्या ३ किमीच्या रस्त्याचे खडी करणाचे काम चालू केले असल्याने विरोधकांनी कुठल्याही प्रकारची माहिती न घेता धनगर समाजाला न्याय तर आदिवासी समाजावर अन्याय्य अश्या बातम्या मीडियात देवून दोन समाजात वाद निर्माण करण्याचे काम केले आहे.
त्यालाच उत्तर देण्यासाठी धनगर समाज आणि गारभट ग्रामस्थ यांनी एकत्र येत विरोधकांचा निषेध करीत आमच्या रस्त्याच्या परवानग्या घेऊनच काम चालू केले असून विरोधकांनी आमच्या रस्त्याला विरोध करू नये , एवढ्या वर्षातून आमच्या गावाला रस्ता होतोय तर तुमच्या पोटात दुखण्याचे कारण काय ? असाही सवाल हर हे चांगभले धनगर समाज संस्थेचे रायगड जिल्हाध्यक्ष ॲड संतोष आखाडे यांनी उपस्थित केला आहे
यावेळी हर हर चांगभले धनगर समाज संस्था रायगड जिल्हाध्यक्ष ॲड. संतोष आखाडे, अध्यक्ष रामचंद्र जानू आखाडे, झिमा आखाडे, जनार्दन आखाडे, सुरेश आखाडे, संजय कोकरे, धोंडू आखाडे, जानू आखाडे, आदी उपस्थित होते.
प्रतिक्रिया
एवढ्या वर्षातून या धनगर वाड्याला कुठेतरी आता न्याय मिळत असून काही विरोधकांनी जाणून बुजून या रस्त्याच्या कामात अडथळा आणून काम बंद करण्याचे षडयंत्र रचून दोन समाजात वाद निर्माण करण्याचे काम विरोधक करत आहेत , मात्र आमच्या संघटनेच्या वतीने याचा निषेध व्यकत करून हा रस्ता पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
जिल्हाध्यक्ष - हर हर चांगभले ध्नगर समाज संस्था रायगड ॲड. संतोष आखाडे
0 Comments