प्रवीणजी काकडे यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार जाहीर

 ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणजी काकडे यांना  राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार जाहीर

 
तरुण पिढीमध्ये शिक्षणाची क्रांती घडविण्यासाठी अहोरात्र मेहनत  घेणारे काकडे.. यांचे उल्लेखनीय कार्य 
   

पाताळगंगा न्युज :  दत्तात्रय शेडगे 
खोपोली : १३ जून,

                   ऑल इंडिया धनगर समाज महासंघांचे प्रदेशाध्यक्ष, तथा थोर समाज सुधारक प्रविणजी  काकडे यांना  राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न  पुरस्कार जाहीर झाला असून  हा पुरस्कार १५  जून रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मंगळवार पेठ पुणे येथे प्रदान करण्यात येणार आहे. 
           सिनेआर्क प्रोडेक्शन मुबंई व रुद्राश फाउंडेशन मुबंई यांच्या वतीने राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कारांचे आयोजन कारण्यात आले आहे.यात ऑल इंडिया धनगर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणजी काकडे यांच्या कार्याची दखल घेण्यात आली, काकडे यांनी वंचित दुर्बल घटकांत शैक्षणिक  चळवळ उभी करून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून तरुण पिढीमध्ये शिक्षणाची क्रांती घडविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत, तर अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती या सारख्या विषयावर प्रबोधन करून डोंगर दर्याखोऱ्यातील  दरवर्षी  विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून गरीब गरजू  अनेक विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात  आले आहे.
            तर समाजातील वंचित गरीब, आणि आर्थिक दुष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांवर होणारे अन्याय,  मेंढपाळावर होणारे हल्ले, यासारख्या अनेक समस्या सोडविण्यासाठी  प्रवीणजी काकडे यांची संस्था नेहमी एक पाऊल पुढे असते, खरोखरच त्यांचे कार्य महाराष्ट्रातील  डोंगर दर्यात पोहचले  असून त्याच्याच कार्याची दखल घेत त्यांना सिनेआर्क  प्रोडक्शन मुबंई व रुद्राश फाउंडेशन मुबंई यांच्या वतीने राज्य स्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. 
              हा पुरस्कार जाहीर झाल्याने सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत. 

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर