भाजपाचे किरण ठाकरे यांच्या पाठपुराव्याला यश

 केळवली गावातील श्री भैरवनाथ मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे नुतनीकरण ,भाजपाचे किरण ठाकरे यांच्या पाठपुराव्याला यश 






पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
खालापूर : १४ जून ,
 
          भारतीय जनता पार्टी पक्षाचे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणुक प्रमुख किरण ठाकरे यांच्या पाठपुराव्यातून कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात अनेक विकासात्मक कामे मार्गी लागली असून अनेक कामे प्रगतीपथावर असताना खालापूर तालुक्यात ग्रामीण केळवली गावातील श्री भैरवनाथ मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाकरीता निधी उपलब्ध झाल्याने या रस्त्याच्या नुतनीकरणाचे काम पूर्णत्वास गेल्याने केळवली ग्रामस्थानी किरण ठाकरे यांच्या पाठपुराव्याचे कौतुक करीत त्यांचे आभार मानले आहेत.
             कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी सर्वच राजकीय पक्षांतील नेते मंडळी आपआपल्या परीने पाठपुरावा करीत असल्याचे मतदारसंघात पाहायला मिळत असताना भारतीय जनता पार्टी पक्षाचे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणुक प्रमुख किरण ठाकरे हे ही मोठया शर्तिने प्रयत्न करीत असल्याने त्यांच्या पाठपुराव्याला यश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मिळाले असता खालापूर तालुक्यात ग्रामीण केळवली गावातील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या नुतनीकरणाकरीता 25/15 योजनेतून 8 लाख रुपयांचा उपलब्ध झाल्याने गावातील रस्त्याचे काँक्रीटीकरण झाल्याने गावकरी मंडळी समाधान व्यक्त करीत आहे, तर गावकरी मंडळीनी किरण ठाकरे यांच्या पाठपुराव्याचे कौतुक होत आहे.



चौकट -
      आमच्या केळवली गावातील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काही अंतराचे नुतनीकरण व्हावे, यासाठी भाजपा युवा मोर्चा उपजिल्हा अध्यक्ष जगदीश आगिवले यांच्या माध्यमातून विधानसभा निवडणुक प्रमुख किरण ठाकरे यांच्या मागणी केली असता किरण ठाकरे यांनी आमच्या मागणीची दखल घेत निधी उपलब्ध करून दिल्याने गावातील रस्ता काँक्रीटीकरण झाल्याने किरण ठाकरे याचे मनापासून आभार तर पुढील काळात ही आमच्या गावाच्या विकासाकरीता पुन्हा निधी किरण ठाकरे यांनी उपलब्ध करून द्यावा, ही अपेक्षा.
     जयेश कर्णूक - भाजपा केळवली बुथ प्रमुख

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर