खोपोलीतल्या सर्पमित्रांनी केली भल्या मोठ्या अजगराची सुटका
पाताळगंगा न्युज : गुरुनाथ साठेलकर
खोपोली : १५ जून,
खोपोली शहरातील कृष्णनगर परिसरा शेजारून वाहणाऱ्या नाल्याच्या बाजूला दाट झाडीत अजगर जातीचा साप मासे पकडण्याच्या जाळ्यात गुरफटून गेल्याची घटना तेथील रहिवासी तौफिक शेख यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तातडीने सर्पमित्र सुनील पुरी यांना संपर्क करून त्या बाबत माहिती दिली.प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन सुनील पुरी यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असता तो अजगर मासे पकडण्याच्या जाळ्यामध्ये पुर्णपणे अडकल्याचे त्यांना दिसून आले.अजगराला पकडून त्याला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेत संकटमुक्त केले.
अजगर बरेच दिवस जाळ्यामध्ये अडकलेल्या अवस्थेत असल्याने त्याच्या शरीराला काहीं कीटक देखील चिकटले होते.अश्या बिकट अवस्थेतून अजगराला लवकरात लवकर मोकळे करणे गरजेचे असल्याने सुनील पुरी यांनी सर्पमित्र चेतन चौधरी आणि अमोल ठकेकर यांच्या मदतीने सावधानता बाळगत,
साधारणपणे ९ फूट लांबीचा पुर्ण वाढ झालेला अजगर भक्ष शोधण्याच्या प्रयत्नात मासे पकडण्याच्या जाळ्यात अडकून पडला होता. अशाच अवस्थेत अजून काही दिवस जर तो राहिला असतात तर त्याचे जगणेही मुश्किल होते मात्र सर्पमित्रांच्या सतर्कतेमुळे अजगराला जीवदान मिळाले.
0 Comments