रायगड जिल्ह्याच्या वतीने डॉ. शेखर जांभळे यांच्या वतीने पेण महावितरण येथे देण्यात आले निषेध पत्र

 रायगड जिल्ह्याच्या वतीने डॉ. शेखर जांभळे यांच्या वतीने पेण महावितरण येथे देण्यात आले निषेध पत्र 



 पाताळगंगा न्यूज :  शिवाजी जाधव 
खोपोली : १४ जून,

         महाराष्ट्र राज्य वीज वितरण विभाग राज्यभरामध्ये सव्वादोन कोटी स्मार्ट इलेक्ट्रिसिटी मीटर बसवत आहे. या स्मार्ट इलेक्ट्रिसिटी मीटर प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ असून आदानी व काही विशिष्ट कंपन्यांचे हितसंबंध झोपण्यासाठी ही सर्व मोहीम राबवली जात आहे.  त्याचा राज्य विद्युत वितरण विभागावर सुमारे ३०  हजार कोटी रुपयांचा बोजा पडणार असून तो हा बील  ग्राहकांकडूनच वसूल केला जाणार आहे.
             तरी राज्यभरामध्ये स्मार्ट मीटर बसविण्याच्या महाराष्ट्र राज्य विज वितरण विभागाच्या निर्णयाविरोधात आम आदमी पार्टी तर्फे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात निषेध सुरू आहे. या अनुषंगाने आम आदमी पार्टी, रायगड जिल्हा वतीने अधीक्षक अभियंता, मंडळ कार्यालय, पेण  महावितरण यांना निवेदन देऊन या प्रकारचा विरोध करण्यात आला. यावेळी संतोष थले, दमन सिंग, कमल चौधरी, सुमन शर्मा आदी पदाधिकारी उपस्थित होते. 
            महावितरण आधीच सातत्य नसणारी सेवा देत असल्याने सर्वसामान्य नागरिक व व्यापारी यांचे आर्थिक, मानसिक व शारीरिक हाल होत आहे. यातूनच प्रीपेड मीटर च्या माध्यमातून होणारी लूट थांबविण्यासाठी आप प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन आम आदमी पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष डॉ. शेखर अलका तुलसीदास जांभळे यांनी केले.महावितरण कडून लूट न थांबल्यास 
जनतेच्या प्रश्नांवर आप घेणार महाराष्ट्रभर आंदोलन असे या निवेदन पत्रात म्हणाले आहे. 

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण