राजिप शाळा वडगाव येथे पर्यावरण विषयी चित्रकला स्पर्धा संपन्न

 राजिप शाळा वडगाव येथे पर्यावरण विषयी चित्रकला स्पर्धा संपन्न




पाताळगंगा न्युज :वृत्तसेवा 
वडगांव :  २२ जून,

              जागतिक पर्यावरण दिन व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत रायगड जिल्हा परिषद शाळा वडगांव येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी वृक्षारोपण,वृक्ष संवर्धन माझी जबाबदारी,पर्यावरण संरक्षणात माझी जबाबदारी,या  चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.यावेळी ९० हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.प्रत्येक गटातून प्रथम व द्वितीय येणाऱ्या मुलांना रोख रक्कम,पारितोषिक मा.सरपंच मा.गौरी महादेव गडगे,ग्रुप ग्राम पंचायत वडगाव, मुख्याध्यापक सुभाष राठोड यांच्या वतीने देऊन गौरविण्यात आले.
             विद्यार्थ्यांना पर्यावरण विषयी आवड निर्माण व्हावे,शिवाय त्यांचे महत्व काय असते.या माध्यमातून त्यांचे महत्त्व समजावे ,वृक्ष लागवड ही काळाची गरज असून त्यांचे संवर्धन ही महत्वाचे आहे.या दोन्ही बाबीचा समन्वय साधून आपणांस या वृक्षांची काळजी घेतली पाहिजे,मानवांस शुद्ध हवा,वेळेवर पाउस पडणे, ,हवा,औषधे,जाळण्यासाठी लाकूड,शेतीचे अवजारे,अश्या अनेक माध्यमातून या वृक्षांचा उपयोग होत असतो.शिवाय वाढीव तापमान यां वरती वृक्ष लागवड शिवाय पर्याय असून या उद्दात विचारांतून हा उपक्रम हाती घेण्यांत आला.
                पहिली ते तिसरी गटात, प्रथम क्रमांक - रोनक राजेंद्र जांभुळकर ,द्वितीय-  स्वराली अनंता घोरपडे  चौथी ते पाचवी गटात समर्थ गणेश मुंढे प्रथम,मनस्वी विजय गडगे द्वितीय तर सहावी ते आठवी गटात यश तानाजी पाटील प्रथम तर कृतिका गोपीनाथ गडगे द्वितीय क्रमांक पटकावला.यावेळी उप शिक्षक वौजिनाथ जाधव,विषय शिक्षिका सरस्वती कवाद, स्वयंसेविका निकिता गडगे,साक्षी जांभुळकर,भाग्यश्री तांबोळी सोनू जाधव व पालकवर्ग उपस्थित होते.
 
चौकट    
मुलांना पर्यावरणविषयक ज्ञान सोबतच प्रात्यक्षिक सुद्धा कळावे,व त्यांच्यात निसर्गप्रेमी,वृक्षांबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले 
मुख्याध्यापक रा.जि.प.शाळा, वडगाव - सुभाष राठोड.

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण