पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण काळाची गरज.... बाबुभाई ओसवाल

 पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण काळाची गरज.... बाबुभाई ओसवाल




पाताळगंगा न्यूज : जयवंत माडपे 
खोपोली : २४ जून, 
   
             शहरात सिमेंटची वाढती जंगले पाहता झाडांची संख्या कमी झाली आहे.यासाठी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन हास्य क्लबचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते बाबुभाई ओसवाल यांनी केले. 
             खोपोली नगरपरिषद शाळा क्रमांक ८ व ९ व खोपोली हास्य क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने लव्हेज शाळेच्या पटांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ,या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ओसवाल बोलत होते.प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा कार्यक्रम करू नये तर प्रत्येक लावलेले झाड हे जगले पाहिजे त्याची जबाबदारी प्रत्येक विद्यार्थी व शाळेतील शिक्षकांनी घ्यावी असेही ओसवाल यांनी याप्रसंगी आवाहन उपस्थितत्यांना केले. 
              याच वेळी शाळा क्रमांक ८ च्या मुख्याध्यापिका प्रियंका भोईर, शाळा क्रमांक 9 चे मुख्याध्यापक श्रीराम पवार, शाळा क्रमांक 10 चे मुख्याध्यापक निलेश थरकुडे, यांनी विचार मांडले. या कार्यक्रमासाठी हास्य क्लबचे अध्यक्ष सरदार कुलवंत सिंग, सामाजिक कार्यकर्ते किशोर पाटील, ज्येष्ठ पत्रकार जयवंत माडपे, हास्य क्लब सदस्य हेमंत नांदे, शिक्षिका वैशाली भंडारे ,ज्योती आढळ ,तेजस्विनी घोडके, प्रमिला कर्णूक,शितल चव्हाण, साबिया खान ,रेश्मा घाडीगावकर ,इत्यादीचा अनेक मान्यवर व विद्यार्थी यांनी वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेतला

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण