खालापूरातील पोखरवाडी येथे पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या मुंबई रिझवी कॉलेजच्या ४ विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

 खालापूरातील पोखरवाडी येथे पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या मुंबई रिझवी कॉलेजच्या ४ विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू 




पाताळगंगा न्युज :  समाधान दिसले 
खालापूर : २१ जून,

           खालापूर तालुक्यात पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या ४ विद्याार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. हे चारही विद्यार्थी मुंबईतल्या बांद्रा रिझवी कॉलेजचे विद्यार्थी होते. तालुक्यातील वावर्ले गावच्या पोखरवाडी इथली ही घटना आहे. येथील सत्य साई बाबा बंधाऱ्याजवळ ३७  विद्यार्थी-विद्यार्थिनी पावसाळी सहलीसाठी आले होते. यातल्या ४ तरुणांचा बुडून मृत्यू झाला असून एकलव्य सिंग, ईशांत यादव, आकाश माने, रणत बंडा अशी मृत युवकांची नावे आहेत. 


            मुंबईतल्या विद्यार्थ्यांचा एक ग्रुप खालापूर तालुक्यात पावसाळी सहलीसाठी आला होता.३७  जणांच्या या ग्रुपमध्ये १७  मुली होत्या. सोंडाई किल्ल्यावर हे सर्वजण ट्रेकिंगसाठी आले होते. तिथून परतत असताना धावडी नदीच्या बंधाऱ्यावरील सांडव्याखाली डुंबण्याचा आनंद घेण्यासाठी हे सर्व विद्यार्थी तिथे थांबले. पण बंधाऱ्यावरील पाण्याच अंदाज न आल्याने ४ विद्यार्थी बुडाले. चार ही विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. खालापूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे आणि कर्मचारी यांचे मार्गदर्शनाखाली अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य आणि पोखरवाडीतील स्थानिक युवकांनी या सर्च ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला होता. 



         तसेच खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम हे स्वतः घटनास्थळी होते. तर सर्वांचे शव चौक प्राथमिक आरोग्य केंद्रात आणली आहेत.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर