अंगारकी चतुर्थी निमित्ताने रंगछंद कलाकारांनी साकारली महड येथे लालबागचा राजा ,लोकमान्य टिळक यांची भव्य दिव्य रांगोळी

 अंगारकी चतुर्थी निमित्ताने रंगछंद कलाकारांनी  साकारली महड येथे लालबागचा राजा ,लोकमान्य टिळक यांची भव्य दिव्य रांगोळी 




पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
महड  : २४ जून

           मुंबई - पुणे महामार्गावर हे अष्टविनायका पैकी असेलेले महड गावातील वरद विनायक यांचे दर्शन घेण्यासाठी खालापूर ,चौक, खोपोली ,कर्जत ,पनवेल ,रसायनी या परिसरातील हजारो भक्त आपल्या लाडक्या वरद विनायकाचे आज मध्यरात्री पासून  दर्शन घेणार आहे.यामुळे अंगारकी चतुर्थी निमित्ताने लाल बागचा राजा,लोकमान्य टिळक,आणी गणपती घडविता मुर्तीकार यांची सुंदर अशी मनमोहक रांगोळी रंगछंद रांगोळी मंडळ अध्यक्ष रोशन पाटील ( कसरखंड ) यांच्या सहकार्यांनी काढण्यांत आली. 

              ही रांगोळी काढण्यासाठी २०   किलो रांगोळी वापर करण्यात आला.तसेच ह्या रांगोळी साठी १६ तास एवढा कालावधी लागला.असून ही रांगोळी ११ /२२  फुट असून यामध्ये सप्त कलर्स तांबडा,नारंगी,पिवळा,हिरवा,जांभळा,निळा,   पांढरा ,लाल, अदि रंगाचा वापर करण्यात आला.त्याच बरोबर २० कलाकर यांनी एकत्र येऊन ही भव्यदिव्य अशी रांगोळी साकारण्यांत आली आहे. 

       रोशन पाटील - कसरखंड, योगेश डाकी -  कोलेटी, मिताली सुर्वे - बेलापूर शुभम कुमरे - अंबरनाथ, मधुरा भोईर - शिरवणे,अमोल -  खानावकर - कानपोली,प्रणिता शिंदे - बीड,स्वप्निल गायकर - चिखले, मयूर हरड - मुरुडबाड, संकेत पाटील - भिवंडी, रोहित भोईर - पडघे 
हेतल म्हात्रे - चिखले, रवींद्र चौधरी - बारवाई, ज्योती पाटील - खोपोली, मनोहर ठाकूर - चिरनेर, पद्मिनी खाडे - खानावले, यश पाटील - बेलवली, आरती घोरपडे -पुणे अजित मटकर -अंबरनाथ, अदि कलाकारांच्या संकल्पनेतून साकारण्यात आली.         

                                                





Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण