लव्हेज ग्रामस्थांचा स्वच्छता जनजागृती मोहीम ,महिला,तरुण वर्गांचा सहभाग

 लव्हेज ग्रामस्थांचा स्वच्छता जनजागृती मोहीम  ,महिला,तरुण वर्गांचा सहभाग  




पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
खोपोली : २४ जून,
  
                 खोपोली नगर पालीका च्या हाद्दीत असलेले लव्हेज गावातील तरुण वर्ग महिला वर्ग हे स्वच्छता जनजागृती मोहीम मध्ये सहभागी झाल्यांचे पहावयांस मिळाले.यावेळी आपल्या घरातील निघणारा ओला - सुखा कचरा कोठे ही न टाकता घंटा गाडी मध्ये टाका म्हणजे आपला परिसर स्वच्छ राहिल.आणी कोणत्याही प्रकाराचे आजार निर्माण होणार नाही.यासाठी नगर पालिका शासन यांनी दिलेल्या नियमांचे पालन करा यावेळी विविध ठिकाणी जावून लोकांमध्ये स्वच्छतेचे महत्व समजावून सांगण्यात आले.
            पावसाचे अगमन झाल्यामुळे अनेक ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव निर्माण होत असतो.कारण ज्या ठिकाणी अनेक दिवस एकाच ठिकाणी पाणी राहते.त्या ठिकाणी डासांची निर्मिती होत असते.यामुळे आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाला.त्यामुळे डासांच्या निर्मितीला आला बसेल,आणी घरातील कुटुंबांना आजारपणांचा सामना करावा लागणार नाही. मात्र ज्या ठिकाणी स्वच्छता असली की रोगराई पसरत नाही.या उद्दात विचारांतून लव्हेज ग्रामस्थांनी विविध ठिकाणी जावून ग्रामस्थांच्या मध्ये जनजागृती केली.
              रेल्वेस्थानक,रस्ता,गल्ली,शाळा,अश्या अनेक ठिकाणी स्वच्छता जनजागृती  मोहीमे राबविण्यांत  आल्यामुळे सर्वत्र ठिकाणी या तरुण वर्गांचे कौतुक होत आहे.आपला परिसर स्वच्छ ठेवा हे असे म्हणत हा परिसर स्वच्छतांच्या घोष वाक्यांनी गर्जून गेल्यांचे पहावयांस मिळाले.पावसाळ्यात तर आपणांस खूप काळजी घ्यावी लागते.मात्र काही नागरिक याकडे दुर्लक्ष्य केले जाते.परिणामी आपणांस विविध आजारांचा सामना करावा लागतो.आपल्या कुटुंबाची आणी ग्रामस्थांची काळजी घेण्यासाठी एक पाउल पुढे टाकत ही मोहीम हाती घेण्यांत आली.
               

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर