अश्विनी मालकर हिच्या वाढदिवसांचे औचित्य साधून राजिप शाळा तळवली येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

 अश्विनी मालकर हिच्या वाढदिवसांचे औचित्य साधून राजिप शाळा तळवली येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप 


पाताळगंग न्यूज : वृत्तसेवा                                           तळवली : २८ जून,

              अतुल मालकर हे राजिप शाळा तळवली येथे सातत्याने सहकार्य करीत असतात.माझा गाव माझा अभियान या उद्देशाने आज त्यांच्या पत्नी अश्विनी मालकर हीचा वाढदिवस असल्यामुळे हा वाढदिवस शाळेय विद्यार्थ्यांच्या मध्ये साजरा करण्यांचा उपक्रम गेले अनेक वर्ष करीत आहे.या निमित्ताने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यांत आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेह-यावर वेगळाच आनंद पहावयांस मिळाला.                                                           आज प्रत्येक जण वाढ दिवस वेगवेगळ्या दृष्टीकोणांतून साजरा करीत असतो.मात्र समाज्यामध्ये  व्यक्ती असे आहेत की, आपला वाढदिवस साजरा गोर - गरीब किंवा शाळकरी मुलांच्या मध्ये काही भेट वस्तू देवून साजरा केला जातो.तळवली येथिल असलेले सामाजिक कार्यकर्ते,तथा सिविल इंजीनियर अतुल मालकर यांच्या पत्नी अश्विनी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रायगड जिल्हा परिषद शाळा तळवली येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.      


                                                       विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शिक्षणामध्ये गोडी निर्माण व्हावी,शिवाय शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांची घरची स्थिती बिकट असते.यामुळे त्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावावा या उद्दात हेतुने हा उपक्रम हाती घेण्यांत आला.तसेच दहावी ,बारावी मध्ये उत्तम गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देवून गौरविण्यांत आले. यावेळी मुख्याध्यापिका -   मंगल मुंढे,शिक्षक - बोरगे,उपस्थित मान्यवर, शालेय व्यवस्थापन कमिटी,अदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर