प्राचार्य प्रशांत माने यांना नवभारत एज्युकेशन पुरस्काराने सन्मानित

 प्राचार्य प्रशांत माने यांना नवभारत एज्युकेशन पुरस्काराने सन्मानित




पाताळगंगा न्युज : जयवंत माडपे 
खोपोली : २८ जून, 
 
          खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या बी. एल.पाटील तंत्रनिकेतनच प्राचार्य प्रशांत माने यांना त्यांच्या शैक्षणिक कालावधी त उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल  मुंबई येथील नवभारत एज्युकेशन अवॉर्ड २०२४ ने सन्मानित करण्यात आले. संस्थेच्या मुंबई येथे संपन्न झालेल्या भव्य कार्यक्रमात मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अशीष शेलार, त्याचप्रमाणे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व संस्थेचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्या हस्ते हा पुरस्कार माने यांना देण्यात आला आहे. 
          आपल्या २६  वर्षाच्या आपल्या शैक्षणिक कार्यकर्तीत भारती विद्यापीठ नवी मुंबई, येथे विभाग प्रमुख , त्यानंतर शांतीनिकेतन पॉलिटेक्निक नवीन पनवेल या ठिकाणी सेवा केली आता खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या बी.एल.पाटील तंत्र निकेतन मध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.त्यांच्या या शैक्षणिक क्षेत्रातील प्रदीर्घ कार्याबद्दल  नवभारत एज्युकेशन संस्थेतर्फे यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
              खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे वरिष्ठ संचालक यशवंतशेठ साबळे, अध्यक्ष संतोष जगम, कार्यवाहक किशोर पाटील, उपाध्यक्ष अबू जळगावकर, सदस्य जितेश ठक्कर इत्यादी मान्यवरांनी संस्थेच्या कार्यालयात माने यांचा गौरव केला. प्राचार्य प्रशांत माने यांच्या शैक्षणिक कारकीर्दीचा खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाला निश्चितच फायदा होणार आहे, आमच्या संस्थेच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भरभराट निश्चितच होणार असल्याचे यशवंत शेठ साबळे यांनी माने यांचा गौरव करताना विश्वास व्यक्त केला. प्राचार्य माने यांनी संस्थेच्या सर्व सन्माननीय संचालक मंडळाच्या सदस्यांचे मनापासून आभार व्यक्त करताना, यापुढेही शैक्षणिक क्षेत्रातील काम प्रामाणिकपणे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या तंत्रनिकेतन चा शैक्षणिक आलेख कसा उंचावेल यासाठी माझे नियमित प्रयत्न असणार असल्याचे पण प्राचार्य माने यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर