खालापूर तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष नागेश पाटील यांची होराळे ग्राम.पं.उपसरपंचपदी निवड
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
खालापूर : २९ जून,
खालापूर तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष तथा होराळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील युवकांचे आधारस्तंभ म्हणून सर्व परिचित असलेले नागेश पाटील यांची आज होराळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी तसेच तालुक्यातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावरून नागेश पाटील यांचे नेतृत्व आगामी काळात खालापूर तालुक्याला नवी दिशा देणारे असेच दिसून येत आहे.
होराळे ग्रुप ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक मागील दोन वर्षांपूर्वी पार पडली होती या निवडणुकीत नागेश पाटील यांना बिनविरोध सदस्य म्हणून निवडून देण्यात आले होते. नागेश पाटील हे भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते असून रवींद्र मोरे यांच्यासोबत ते भारतीय जनता पार्टीचे सक्रिय काम करताना दिसत आहेत.आज हुराळे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत नागेश पाटील यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध करण्यात आली आहे. नागेश पाटील यांची बिनविरोध निवड होणार हे अगोदरच सर्वांना माहीत असल्यामुळे तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते नागेश पाटील यांचे अभिनंदन करण्यासाठी होराळे ग्रुप ग्रामपंचायतच्या सभागृहात उपस्थित राहिले होते. एक युवक ग्रामपंचायतचा उपसरपंच होत असताना जर तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी व नेते त्याला शुभेच्छा देण्यासाठी येत असतील यावरून नागेश पाटील यांची राजकीय वाटचाल किती नेतृत्वशाळी आहे हे दिसून येते.
0 Comments