अमली पदार्थ सेवन विरोधी विद्यार्थ्यांची जनजागृती मोहीम

 अमली पदार्थ सेवन विरोधी विद्यार्थ्यांची जनजागृती मोहीम 




पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
वडगांव : ३० जून,

        अमली पदार्थ शरिरासाठी घातक आहे.मात्र तरी सुद्धा तरुण वर्ग यांचे सेवन करीत असतात.मात्र शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या लहान मुलांच्या वरती हे पदार्थ शरिरास घातक असून,त्यांचे दुषपरिणाम खूप भयंकर आहे.यांची एकदा यांची सवय लागली ते सुटणे जवळ - जवळ अशक्य होत असते.यामुळे रायगड जिल्हा परिषद शाळा वडगांव येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्ताने जागतिक अमली पदार्थ सेवन विरोधी मुख्याध्यापक सुभाष राठोड शिक्षक,विद्यार्थी यांनी जनजागृती रॅली काढण्यांत आली.यावेळी या परिसरातील ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्यांचे पहावयांस मिळले.
                 यावेळी विद्यार्थ्यांनी हातात अमली पदार्थांचे फलक घेवून ग्रामस्थांच्या मध्ये जनजागृती करण्यांत आली.यावेळी तंबाखू ,गुटखा,विडी सिगार,दारु,ड्र्ग्स असे मानवी शरिरास घातक कारक ठरत असलेल्या सर्वच नशेली पदार्थ सेवन करु नये असे प्रबोधन विद्यार्थ्यांनी या रॅली मध्ये केले.यावेळी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यांत आले.त्याच बरोबर पोस्टर रंगवणे या मध्ये सर्वच विद्यार्थानी सहभाग  नोंदविला असल्यांचर पहावयांस मिळाले.
          स्पर्धेत उत्तम गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम स्वरूपात, बक्षिसे व वह्यांचे वाटप करण्यात आले.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मा.करुणा ठोंबरे,उपाध्यक्षा राजश्री जांभुळकर, ,शिक्षक,पालक,शाळा व्यवस्थान समिती सदस्य उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संचालन वैजनाथ जाधव यांनी केले तर प्रास्ताविक व आभार मुख्याध्यापक -  सुभाष राठोड  यांनी केले.या कार्यक्रमासाठी विषय शिक्षिका सरस्वती कवाद,स्वयं सेविका साक्षी,निकिता,भाग्यश्री,अकांक्षा व माजी विद्यार्थी ऋषिकेश जाधव,श्रुतिका जांभुळकर यांनी सहकार्य केले.





Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर