कोयना प्रकल्पग्रस्त जनतेचे ठिय्या आंदोलन यशस्वी,प्रकल्पग्रस्त जनतेचा मोठया प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
खालापूर : २९ जून,
कोयना प्रकल्पग्रस्त जनतेने पुकारलेले एक दिवसीय ठिय्या आंदोलन यशस्वी झाल्याने २ जुलै २०२४ रोजी कोकण भुवन ते विधान भवन लाँग मार्च यशस्वी होईल असा आत्मविश्वास कोयना प्रकल्पग्रस्त जनतेत निर्माण झाला आहे.
सातारा जिल्ह्यातील कोयना जल विद्युत प्रकल्पा मुळे १०५ गावांचे स्थलांतर १९५९ साली रायगड,ठाणे,सातारा,रत्नागिरी,सांगली, पालघर जिल्ह्यात झाले. त्यावेळी पुनर्वसन कायदा अस्तित्वात नव्हता. तत्कालीन नेते यांच्या शब्दावर विश्वास ठेऊन प्रकल्पग्रस्त जनतेने स्वखर्चाने जमिनी घेऊन वसाहती स्थापन केल्या. गेली ६४ वर्ष पर्यायी जमीन, नागरी सुविधा,नोकरी, प्रकल्पग्रस्त दाखले, बेरोजगार भत्ता यापासून प्रकल्पग्रस्त वंचित आहेत. गेली अनेक वर्षे आंदोलन,उपोषण,निवेदन,बैठक, रास्ता रोको करून देखिल शासनाला जाग आली नाही, त्यामुळे अखिल कोयना पूनर्वसाहत सेवा संघाच्या माध्यमातून राज्यातील सात जिल्ह्यातून वीस तालुक्यात एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.आज ज्या ज्या ठिकाणी कोयना प्रकल्पग्रस्त वसाहती आहेत, त्या तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. खालापूर तालुक्यात आज ठिय्या आंदोलना ला जनतेने पाठींबा दिला, हा लढा २ जुलै २०२४ रोजी कोकण भुवन ते विधान भवन लाँग मार्च काढून शासनाला इशारा देण्यात येईल.
आज अप्पर तहसीलदार पुनम कदम व नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी निवेदन स्वीकारून आपले म्हणणे शासन दरबारी त्वरित कळविण्याची कार्यवाही करु असे आश्वासन दिले.यावेळी सकल मराठा रायगड जिल्ह्याच्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्य समन्वयक डॉ. सुनिल पाटील, विनोद साबळे उपस्थितीत होते. यावेळी अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघाची कार्यकारिणी उपस्थितीत होती.
0 Comments