मुख्याध्यापक सुरेश गंगाराम अडसूळे यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न,प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सेवापुर्ती समारंभ संपन्न.....
पाताळगंगा न्यूज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : ३० जून,
रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांढरोली शाळेचे मुख्याध्यापक सुरेश गंगाराम अडसुळे यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ खालापूर तालुका प्राथमिक शिक्षक संघ व खालापूर केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने संपन्न झाला.यावेळी शाळेय शिक्षक उपस्थित होते.
मुख्याध्यापक सुरेश अडसुळे यांनी शिक्षण क्षेत्रातील ३८ वर्ष सचोटीच्या सेवेनंतर ह्या सेवेतून निवृत्त होत आहेत.त्या निमित्ताने शिक्षक परिवाराच्या वतीने त्यांचा सेवापूर्ती सत्कारसमारंभ आयोजन करण्यात आला.अतिशय खडतर परिश्रमातून उभे राहिलेले हे व्यक्तिमत्व त्यांच्याकडे शांत,संयमी व कर्तव्यदक्ष शिक्षक मार्गदर्शक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. स्वतः कायद्याचे अभ्यासक असून कायम मार्गदर्शक म्हणून भूमिका आपल्या समाजात शिक्षक वर्गात असायची.कित्येक सामाजिक लढ्यातही आग्रही भूमिका त्यांनी बजावल्याची बोलले जाते.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जयश्री सुर्वे,विषय शिक्षिका कांढरोली शाळा यांनी केले.सर्वांचे आभार उस्मान सैयद यांनी मानले असून या कार्यक्रमास वरिष्ठ विस्तार अधिकारी,शिल्पा दास,केंद्रप्रमुख ,नंदा मोहिते,खालापूर तालुका प्राथमिक शिक्षक संघ अध्यक्ष ,संदीप जाधव,सरचिटणीस दिपक पालकर, जिल्हा उपाध्यक्ष हेमंत म्हात्रे,जिल्हा उपाध्यक्ष सचिन कडू,माजी अध्यक्ष संतोष पाटील, माजी अध्यक्ष उमेश विचारे,खजिनदार विठ्ठल देशमुख,कार्याध्यक्ष ,मारुती दासरे,अंजली विचारे,धनाजी थिटे अनिता चव्हाण,दिपाली कांबळे,वंदना कदम,आदी गुरुजनवर्ग,पालक ग्रामस्थ,विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments