रायगड जिल्हा परिषद शाळा, वडगाव येथे वह्या वाटप डॉ.युवराज मशेलकर स्वक्रेटरी प्रायमा मेडिकल असोशियसन्स रसायनी यांचा पुढाकार
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
वडगांव : २ जुलै
रायगड जिल्हा परिषद शाळा वडगाव येथे आज शाळेतील मुलांना वर्षभराच्या अभ्यासासाठी प्रायमा मेडिकल असोशियसन्स रसायनी यांच्याकडून वह्यांचे वाटप करण्यात आले.वडगाव सह केंद्रातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना सुद्धा वह्यांचे वाटप करण्यांत येणार असल्यांचे असोशियसन्स यांच्या माध्यमातून सांगण्यात आले.विशेष म्हणजे या मध्ये सर्व डॉक्टरांचा सहभाग असून त्यांचा पुढाकारांने हा उपक्रम हाती घेण्यांत आला.
हा उपक्रम सेक्रेटरी डॉ.युवराज मशेलकर यांनी पुढाकार घेत वह्यांचे उपलब्धता करून घेतली.यावेळी माजगाव केंद्राचे मा.केंद्रप्रमुख जे.पी.परदेशी यांनी मोलाची भूमिका बजावली.वह्या वाटप कार्यक्रमाप्रसंगी डॉ.निशिगंधा युवराज मशेलकर,डॉ.अनिल पाठक,डॉ.त्रिंम्बके, डॉ.सतीश जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमास सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.युवराज मशेलकर यांनी केले या प्रसंगी बोलताना शाळेत शिक्षण घेत असतांना आपल्याकडे वह्या नाहीत म्हणून कोणाचे शैक्षणिक नुकसान होवू नये या भावनेतून वह्या वाटप करण्याची संकल्पना सुचली,या पुढेही असोसिएशन विद्यार्थी हितासाठी पुढाकार घेईल.असे सांगण्यात आली.आम्ह्वी सातत्याने सहकार्य करण्यांस तत्पर असून,मुलांच्या चेह-यावरील आनंद हेच आम्हाला समाधान असे मत प्रायमा मेडिकल असोशियसन्स व्यक्त केले. तसेच सूत्रसंचालन मुख्याध्यापक राजिप शाळा वडगांव सुभाष राठोड यांनी केले.
0 Comments