तरुण वर्गांनी विविध ठिकाणी वृक्ष लागवड,ग्रामस्थांकडून कौतुकांची धाप

 तरुण वर्गांनी विविध ठिकाणी वृक्ष लागवड,ग्रामस्थांकडून कौतुकांची धाप 



पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
माजगांव / आंबिवली : ३ जुलै,

             वृक्ष लागवड आणी त्यांचे संवर्धन ही काळाची गरज आहे.अगामी काळातील धोके यांची जाणीव होवून  वृक्ष लागवड करुन पर्यावरणात निर्माण  होणा-या  प्रदूषित घटकांना रोखण्यांचा संदेश मनोज जयवंत पाटील,चैतन्य राम पाटील,प्रतीक गणेश काठावले तरुण वर्गांने दिला आहे.रस्त्यावर ,माळरान,शेताच्या बांधावर,स्मशानभूमी अशा अनेक ठिकाणी वृक्षांची लागवड केल्यामुळे जणू या ठिकाणी हिरवळ निर्माण झाली आहे.पावसासाच्या अगमनाने हे वृक्ष या सौंदर्य सृष्टी मध्ये भर घालत आहे.
               माजगाव येथिल तरुण युवकांनी   वृक्ष लागवड करून सामाजिक बांधिलकी जोपासण्यांचा संदेश दिला.कोरोनांच्या काळात ऑक्सिजनची किती मोल आहे.यांचे समिकरण ओळखून तरुण वर्ग पावसाळ्यात विविध वृक्ष लागवड चा कार्यक्रम हाती घेत आहे. रणरणत्या उन्हामध्ये वाटसरूंना रस्त्यावरील असलेल्या झाडांची सावळी मोठी पर्वणी वाटते.शिवाय या वृक्षांच्या मुळे शुद्ध ऑक्सिजन,पाऊस,जमिनीची धुप थांबणे असे अनेक फायदे या वृक्ष लागवडीतून मिळत आहे.यामुळे आजच्या तरूण युवकांना समजले आहे.                                                                              आज पर्यावरणाचा समतोल ठासळत चालला ,माती उत्खलन ,वृक्ष तोड अनियमित पडणारा पाऊस ,दुष्काळ असे विविध समस्याला तोंड वासून निर्माण झाल्या आहेत यांस एक मेव कारण म्हणजे वृक्ष तोड,यामुळे अगामी काळाचे धोके ओळखता वृक्ष लागवड आणी संवर्धन ही काळाची गरज आहे या उद्दात हेतूने वृक्ष लागवड समवेत संवर्धन चा कार्यक्रम हाती घेण्यात आल्यांचे माजगांव येथिल  या तरुणांने पाताळगंगा न्यूज  प्रतिनिधी शी बोलताना सांगितले.

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण