बोरघाटात अंडा पॉईंट जवळ कंटेनरने दिली तीन कारला जोरदार धडक ,कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने कंटेनर पलटी
पाताळगंगा न्यूज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : १९ जुलै,
मुबंई पुणे एक्सप्रेस बोरघाटात अंडा पॉईंड जवळ व एका कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने त्याने समोतील तीन कार ला धडक देऊन कंटेनर पलटी झाला,
मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून पुण्याहून मुबंई कडे कंटेनर क्रमांक ( NL 01AC 1283 ) हा बोरघाटात अंडा पॉईंड जवळ आला असता त्याचा ब्रेक फेल झाल्याने त्याने एर्टिगा कार क्रमांक (MH 01DP 6516 ) तर स्विफ्ट क्रमांक ( MH 04LQ3778 ) तर व्हागेनर कार क्रमांक ( MH 46BV 1894 ) या तीन कारला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात होऊन कंटेनर एक्सप्रेसवेवर पलटी झाला,
कंटेनर मधील चालक व क्लीनर याला किरकोळ मार लागला असून त्यांना त्यांना तात्काळ इमजिएम रुग्णालय पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, तर कार मधील कोणालाही दुखापत झाली नाही, तर एक्सप्रेस वेवरील पडलेला कंटेनरला क्रेनच्या साहाय्याने बाजूला घेऊन रस्ता वाहतुकीसाठी चालू करण्यात आला आहे
0 Comments