ह.भ.प.वै. आनंदीबाई (ताई) मोतीराम भोईर यांचे अल्पशा आजाराने निधन

 ह.भ.प.वै. आनंदीबाई (ताई) मोतीराम भोईर यांचे अल्पशा आजाराने निधन 



पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
कोपरी : ३ जुलै,


          खालापूर तालुक्यातील कोपरी गावात राहणारे ह.भ.प.वैकुंठवासी आनंदीबाई (ताई) मोतीराम भोईर यांचे अल्पशा आजाराने शनिवार दि. २९/०६/२०२४ रोजी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.ते वयाच्या ६५ वर्षाच्या होत्या.त्यांच्या अंत्यविधीस सामाजिक,राजकीय,वारकरी आशा विविध स्तरातील मान्यवर त्यांच्या अंत्य दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते.                                                              त्यांचा मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी अनेक माणसे जोडली गेली.सर्व समाजामध्ये ऐक्यांचे,बंधुत्त्वाचे,शांतता व सलोख्याचे वातावरण निर्माण होण्याकरता ते सतत प्रयत्नशील असायचे ईश्वर भक्ती वर मोठी श्रद्धा होती.अशी व्यक्ती सोडून गेल्यांने  कुटुंब आणि ग्रामस्थ यांच्या वरती शोककला पसरली आहे.          
                        त्यांची दशक्रिया विधी सोमवार दिनांक ०८/०७/२०२४ रोजी श्री क्षेत्र पाली उध्दर रामेश्वर येथे होणार आहेत.तसेच सायं. ५ ते ६ वा. ह.भ.प. सच्चिदानंद महाराज कांबेकर (कांबे) यांचे प्रवचन होईल.तसेच त्यांचे उत्तरकार्य  गुरुवार दि. ११/०७/२०२४ रोजी राहत्या घरी (कोपरी) येथे होणार आहे. सकाळी १० ते ११ वा. ह.भ.प. रायगड भुषण रामदास (भाई) महाराज पाटील (खोपोली) ( गुरुकुल महड ) यांचे प्रवचन होईल.
                दि. १०/०७/२०२४ रोजी सायं. ५ ते ६ वा. ह.भ.प. दिलीप (दादा) महाराज राणे (हालिवली)यांचे प्रवचन होईल. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा उत्तम मोतिराम भोईर ( मराठा समाज अध्यक्ष , प्रकाश मोतिराम भोईर,सुनिल मोतिराम भोईर  ह.भ.प. मोतिराम सिताराम भोईर,तसेच बहिणी,सुना ,नातवंडे ,पंतवडे ,जावई, असा मोठा परिवार आहे. 



Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर