ग्रामीण रुग्णालय चौक येथे आपत्कालीन मदत प्रशिक्षण शिबिर संपन्न

 ग्रामीण रुग्णालय चौक येथे आपत्कालीन मदत प्रशिक्षण शिबिर संपन्न 




पाताळगंगा न्युज : गुरुनाथ साठेलकर 
खोपोली : १९ ऑगस्ट,

             अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था - रायगड व लाइफगियर सेफटेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्यातून ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी आपत्कालीन मदत प्रशिक्षण शिबिर आयोजित केले गेले होते.या शिबिरात रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, सेवक, कर्मचारी आणि रुग्णांनी देखील सहभाग घेतला होता. एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यानंतर हाती असलेल्या संसाधनातून कशाप्रकारे परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येते याचे प्रात्यक्षिकासह विस्तृत असे मार्गदर्शन अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे गुरुनाथ साठेलकर, लाइफगियर सेफटेक प्रायव्हेट लिमिटेडचे पंकज बागुल आणि सौरभ घरत यांनी केले. 
             चौक ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ सविता कालेल यांनी पुढाकर घेऊन या शिबिराचे आयोजन केले होते. रुग्णालयात उपलब्ध असलेली संसाधने, आग प्रतिबंधक उपकरणे आणि साहित्य यांचा वापर कसा व कोणत्या वेळी करावा याबाबत  चित्र स्वरूपात माहिती देऊन कर्मचाऱ्यांकडून त्यांची हाताळणी देखील करवून घेतली गेली. शिबिराच्या शेवटी रुग्णालय परिसरात प्रत्यक्ष आग लावून त्यावर नियंत्रण आणण्याचे धडे कर्मचाऱ्यांना दिले गेले. 
             महाराष्ट्रात विविध ठिकाणी रुग्णालयात झालेले अपघात पाहता रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना अश्या प्रसंगात मदतकार्य करण्याकरता योग्य प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याने आपण या शिबिरासाठी आग्रह धरल्याचे डॉ. सविता कालेल यांनी यावेळी प्रतिपादन केले. विजय भोसले, अमित गुजरे आणि चौकट ग्रामपंचायतचे सदस्य निखिल मालुसरे हे देखील शिबिरात उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर