खो.न.मा. मा. नगरसेवक कामाल भाई पटेल यांनी सुधाकर घारे यांच्यावर विश्वास ठेवत शेकडो कार्यकर्ते सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केला जाहीर प्रवेश
पाताळगंगा न्युज : शिवाजी जाधव
खोपोली : २७ ऑगस्ट,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित संवाद गाव दौरा समारोह आयोजित करण्यात आले होते.गेले अनेक दिवस कर्जत विधानसभा गाव दौरा सुरू केल्यामुळे या दौऱ्याचा शेवट आज खोपोली येथे करण्यांत आला.आज नगरसेवक कमलभाई यांच्या समवेत खोपोली शिल्पाताई येथील मुस्लिम समाजाने तसेच खालची खोपोली, येथील अनेक युवकांनी सुधाकर घारे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) मध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.
खोपोली येथे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करत असताना आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर जाहीर टीका केली. जर आपण सत्तेत आहोत तर रोजगार मेळावा कशासाठी आयोजित केला.१० हजार रोजगार देणार होते मात्र १४०० युवक आले. स्थानिक कंपन्या किती होत्या हे सांगा असे आवाहन केले.
ज्या पक्षाच्या जोरावर निवडून आले त्या मा. उद्धव ठाकरे यांना फसवले अनेक पक्ष फिरलेला माणूस आपला कसा होईल अशी सडकून टीका केली.तर कर्जत खालापूर विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वर्चस्व असून या हुकूमशः विरुद्ध मी कर्जत खालापूरच्या विकासासाठी लढणार आहे.माझ्या कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का दिला तर तुमची आग नक्कीच विजू असा या सभेत सज्जड दमच दिला आहे.
पक्ष सामील झालेल्यांनी खबरदारी घेऊन सन्मानाची वागणूक देऊ. असे सुधाकर घारे यांनी सांगितले.या कार्यक्रमाला.सुधाकर घारे, खो.न.पा मा. नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर, कर्जत तालुका अध्यक्ष रंजना धुळे, मनीष यादव, रमेश जाधव, निलेश आवटी, राकेश दाबके, सचिन मसुरकर, महादू जाधव, वैभव भोईर, यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते,महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments