वारसा संस्कृतीचा कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 महिला आघाडी खोपोली आयोजित वारसा संस्कृतीचा कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.



 पाताळगंगा न्युज :  शिवाजी जाधव 
खोपोली : २७ ऑगस्ट,

              आमदार महेंद्र शेठ थोरवे फाउंडेशन आणि शिवसेना शिंदे गट महिला आघाडी खोपोली शहराच्या वतीने वारसा संस्कृतीचा या कार्यक्रमाचे आयोजन महाराजा मंगल कार्यालय येथे करण्यांत आले होते.हा वारसा संस्कृतीचा कार्यक्रमाला खोपोलीसह खालापूर तालुक्यातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्यांचे पहावयांस मिळाले. 
             दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रावण महिन्याचा आनंद घेण्यासाठी शेकडो महिला एकत्रित आल्यांचे पहावयांस मिळाले.यावेळी  खोपोली शहरातील महिलांनी संपूर्ण वर्षभरात साजरे होणारे सण तसेच पथनाट्य, मंगळागौर, पारंपरिक आदिवासी नृत्य, सादर करुन त्यांची संस्कृती,परंपरा आपल्या नृत्यातून दाखवण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यांत आला.
              शिवाय महिलांसाठी खास लकी ड्रॉ ठेवण्यात आले होते.यावेळी तीन विजेत्यांना रोख रक्कम तसेच मानाची पैठणी देखील देण्यात आली.अभिनेत्री रश्मी अनघाट, तसेच ढोलकीच्या तालावर फेम सोनाली पवार या कार्यक्रमाचे खास आकर्षण होते.या कार्यक्रमाला खालापूर खोपोलीतील महिला आघाडी कार्यकर्त्या पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर