राजिप शाळा सावरोली विद्यार्थ्यांनी गावात स्वच्छता आणि जनजागृती मोहिम,व पथनाट्य

 राजिप शाळा सावरोली विद्यार्थ्यांनी गावात स्वच्छता आणि जनजागृती मोहिम,व पथनाट्य 




पाताळगंगा न्युज :  दत्तात्रय शेडगे 
खोपोली : २७ ऑगस्ट,


           रायगड जिल्हा परिषद येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे तसेचे पाणी वाचवा ही मोहीम शिक्षाकांनी हाती  घेतली.दिवसेंदिवस घरातून कचरा निघत असतांना त्यांचे वर्गिकरण करा,तसेच पाण्यांचा वापर काटकसरणी करा अवाहन सावरोली गावात जावून स्वच्छता करून जनजागृती,पथनाट्य  विद्यार्थी करीत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे कौतुक होत असल्यांचे पहावयांस मिळाले.
           शाळेचे मुख्याध्यापक बळीराम चव्हाण यांच्या संकल्पनेतून आणी  मार्गदर्शनाखाली स्वच्छता मॉनिटर कार्यक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांनी सावरोली गावातील घरोघरी जाऊन सफासफाई केली प्रत्यक्ष पाण्याचा वापर करताना होणाऱ्या चुका, होणा-या यांची जाणीव करुन देण्यांत आली. घरातील केर- कचरा व्यवस्थापन आणि वापर यांच्यातील होणाऱ्या उणीवा त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या, तर पथनाट्य सादरीकरण करून विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रबोधन करून जनजागृती केली. 
         यावेळी मुख्याध्यापक बळीराम चव्हाण, शिक्षक नारायण गाडे, धनाजी थिटे, जगदीश मोहने, दादासाहेब मुंजाळ, अंकिता चौगुले आदिसह अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण