वेस्ट इंडिया पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत बबन झोरेला रौप्य पदक,महाराष्ट्राचे नाव केले उज्वल...
पाताळगंगा न्युज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : ४ ऑगस्ट
वेस्ट इंडिया पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत बबन झोरे यांनी ५१७ .५ किलो वजन उचलून रौप्य पदक मिळवून महाराष्ट्राचे नाव उज्वल केले.
वेस्ट इंडिया पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धा २ ते ४ ऑगस्ट रोजी चित्तोरगड राज्यस्थान येथे आयोजित करण्यात आल्या होत्या.या स्पर्धा संपूर्ण भारत देशाच्या होत्या यात बाहेरच्या राज्यातून ३०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता तर महाराष्ट्रातून २२ खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
यात खालापूर तालुक्यातील वाघेश्वर या गावातील बबन झोरे यांनी पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सहभाग घेतला होता, या स्पर्धेत बबन बाबू झोरे यांनी ५१७.५ किलो वजन उचलून रौप्य पदक पटकावून महाराष्ट्राचे नाव मोठे केले.
तर या अगोदर बबन झोरे यांनी स्काट या प्रकारात १७५ किलो तर बेंच प्रेस स्पर्धेत ११७.५ किलो वजणी गटात तर डेडलीफ्ट स्पर्धेत २२५ किलो वजन असे एकूण ५१७.५ किलो वजन उचलून पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रौप्य पदक मिळवून महाराष्ट्राचे नाव मोठे केले आहे. बबन बाबू झोरे यांना रौप्य पदक मिळाल्याने त्याच्यावर सर्वच स्तरावून अभिनंदन होत असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.
0 Comments