वावोशी येथे लायन्स क्लब खालापूर व भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा आघाडी यांच्या सहकार्याने

 वावोशी येथे लायन्स क्लब खालापूर व भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा आघाडी यांच्या सहकार्याने 

महाआरोग्य शिबीर २५० ते ३०० रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी, 


माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
वावोशी : २४ सप्टेंबर 


लायन्स क्लब खालापूर सातत्याने नाविन्यपुर्ण उपक्रम राबवून समाज्यांची सेवा करण्यांसाठी सातत्याने अग्रेसर असून आज वावोशी आरोग्य केंद्र येथे महाआरोग्य शिबीर राबविण्यात आले.यावेळी भारतीय जनता पार्टी खालापूर व युवा मोर्चा आघाडी यांच्या सहकार्याने हे महाआरोग्य शिबीर वावोशी आरोग्य केंद्र येते २५० ते ३०० रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी,करण्यांत आली.यावेळी नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाल्यांचे पहावयांस मिळाले.
         या आरोग्य शिबीरात शरिरांची पुर्ण तपासणी करण्यांत आली.यावेळी नेत्र तपासणीत १५० रुग्णांनी तपासणी केली यावेळी २० रुग्णांस मोतिबिंदू झाल्यांचे  निदर्शनास आले असून त्यांच्यावर नायर हॉस्पिटल पनवेल येथे मोफत डोळ्यांवरती शस्त्रक्रिया करण्यांत येणार आहे. तसेच ७० रुग्णांस मोफत चस्मे वाटप करण्यांत आले.त्याची बरोबर बीपी,शुगर ईसीसी तसेच हाडाची तपासणी करण्यांत आली.तसेच या शिबीराला आलेल्या व्यक्तींने रक्तदान केले.ह्या आरोग्य शिबीरासाठी मेडिकव्हर हॉस्पिटल खारघर,एमजीएम हॉस्पिटल कामोठे,नायर हॉस्पिटल नवीन पनवेल येथील सर्व डॉक्टर व कर्मचारी यांच्या उपस्थित तपासणी करण्यांत आली.
         या कार्यक्रमास लायन अध्यक्ष किशोर नामदेव, पाटील,शिवानी ताई जंगम,ज्योती देशमाने,नागेशजी देशमाने,अशोक पाटील,हरिभाऊ जाधव,विक्रम साबळे ,तसेच ऋषी चालके भाजप- नरेशजी पाटील,अविनाशजी कोळी,यशवंत, साबळे,काशिनाथ पारठे, सनी यादव, श्वेता ताई मनवे,राकेश जाधव,नागेश पाटील,संजय देशमुख, बुरुमकर महाराज, विठ्ठल जी मोरे, सरपंच उपसरपंच व सदस्य व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

सामाजिक कार्यकर्ते मारुती ज.ढवाळकर यांचा स्तुत्य उपक्रम